विदेशी तरुणाच्या घरात आढळली अमली पदार्थांची प्रयोगशाळा

गोव्यात बऱ्याच ठिकाणी अमली पदार्थांचे अनधिकृतपणे विक्री केली जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी अमली पदार्थांची अनधिकृतपणे प्रयोगशाळाही निर्माण करण्यात आल्या आहेत. अशाच एका प्रयोगशाळेला उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Goa
representative photo
प्रातिनिधिक फोटो

दररोज गोव्याला शेकडो पर्यटक येत असतात. समुद्र किनाऱ्याला लाभलेले निसर्ग सौंदर्य हे या गोव्याचे वैशिष्य आहे. परंतु, याच गोव्यात बऱ्याच ठिकाणी अमली पदार्थांचे अनधिकृतपणे विक्री केली जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी अमली पदार्थांची अनधिकृतपणे प्रयोगशाळाही निर्माण करण्यात आल्या आहेत. अशाच एका प्रयोगशाळेला उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोव्याच्या म्हापसा शहरातील हणजूण परिसरात ही प्रयोगशाळा आढळली आहे. पोलिसांनी ही प्रयोगशाळा उधळली आहे. ही प्रयोगशाळा बनवणाऱ्या विदेशी तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई हणजूणचे पोलीस निरिक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विदेश पिळगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश

काय आहे नेमकं प्रकरण?

गोव्याच्या म्हापसामधील हणजणूच्या स्टारको जंक्शनमध्ये अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी सापडा रचला आणि आरोपीला अटक केले. अटक करण्यात आलेला आरोपी कोलेर ख्रिस्तीना हा ऑस्ट्रियन देशाचा नागरिक आहे. त्याची झडती केली असता पोलिसांना एमडीएमएम,डीजीएल,चरस,कॅटामाईन,अॅफ्टामाईन असे एकून तीन लाख दहा हजार रुपयांचे अमली पदार्थ सापडले आहे. पोलिसांनी या विदेशी तरुणाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात रासायनिक प्रयोगशाळा आढळली. त्याठिकाणी विषासह २१ विविध प्रकारची रसायने आणि अमली पदार्थ सापडले. या सर्व पदार्थांची किंमत १ कोटी रुपयांपर्यंत आहे. पोलिसांनी या सर्व अमली पदार्थांना जप्त केले आहे. शिवाय, अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत कोलेर याला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


हेही वाचा – अमली पदार्थ तस्कराला अटक