घरट्रेंडिंगअमेरिकेचं 'चिनुक' भारतीय वायुसेनेत दाखल; पाहा वैशिष्ट्यं

अमेरिकेचं ‘चिनुक’ भारतीय वायुसेनेत दाखल; पाहा वैशिष्ट्यं

Subscribe

विशेषत: सियाचीन आणि लदाख या ठिकाणी चिनुक हेलिकॉप्टर हे भारतीय वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे.

अमेरिकेच्या ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्सची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी आली आहेत. यामुळे भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे. शक्तिशाली अशा चिनुक हेलिकॉप्टरची पहिली बॅच गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर पोहोचली. अधिकृत सूत्रांनुसार, चिनुक विमानांचं हे पथक लवकरच भारतीय वायुसेनेमध्ये दाखल होणार आहेत. विशेषत: सियाचीन आणि लदाख या ठिकाणी चिनुक हेलिकॉप्टर हे भारतीय वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. भारत सरकारने अमेरिकेकडून २२ ‘अॅपेचे’ हेलिकॉप्टर्स आणि १५ ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स विकत घेण्याबाबत २०१५ मध्ये करार केला होता. दरम्यान, याचवर्षी ही सर्व पंधरा हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील, असा अंदाज वायुसेनेकडून वर्तवण्यात येत आहे.


‘चिनुक’ हेलिकॉप्टरविषयी थोडक्यात…

  • ‘बोइंग सीएच-४७ चिनुक’ हे एक अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे
  • अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील हे शक्तिशील मालवाहू हेलिकॉप्टर आहे
  • ‘चिनुक’च्या मागे आणि पुढे अशा दोन्ही बाजूंना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे दोन मोठे पंखे आहेत
  • १९५६ साली अमेरिकी सैन्य दलांना जुन्या सिकोस्र्की सीएच-३७ ही मालवाहू हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नव्या हेलिकॉप्टरची गरज होती
  • त्यावेळी व्हटरेल मॉडेल ११४ किंवा वायएचसी-१बी नावाचे हेलिकॉप्टर स्वीकारण्याचे ठरले
  • त्यानंतर व्हटरेल कंपनीला बोइंगने विकत घेतल्यावर हेलिकॉप्टरचे नाव बदलून ‘सीएच-४७ ए चिनुक’ असे ठेवण्यात आले
  • ४० वर्षांहून अधिक काळ हे हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्यात कार्यरत आहेत
  • हेलिकॉप्टरचे पंखे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे असल्यामुळे, एका रोटरने तयार होणारा टॉर्क दुसऱ्या रोटरने नाहीसा होतो
  • त्यामुळे चिनुकला उड्डाणादरम्यान स्थैर्य लाभते. यामुवळे खराब हवामानात अन्य हेलिकॉप्टरच्या तुलनेत चिनुकचा अधिक फायदा होतो
  • चिनुकच्या प्रशस्त फ्युजलाजमुळे त्याच्या आतमध्ये अवजड लष्करी वाहनं सहज भरुन नेता येतात
  • याशिवाय हेलिकॉप्टरच्या तळाला ३ हूक असून, त्याला तोफा, जीप, चिलखती वाहनं आदी टांगून नेता येतात
  • चिनुक ताशी २६९ किमी वेगाने १२०० किमी इतके अंतर कापू शकते
  • अमेरिकेसह इराण, ग्रीस, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इटली, स्पेन, जपान या देशांकडेही चिनुक हेलिकॉप्टर आहे
  • अशा या शक्तीशाली आणि युद्धासाठी उपयुक्त अशा चिनुकचा भारतीय वायुसेनेत प्रवेश होणार आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -