घरदेश-विदेशशहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

Subscribe

शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यावर आज मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीर मधील गुरेझ येथे झालेल्या चकमकीत शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरमरण आले आहे. मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाल्यानंतर अंत्यर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कौस्तुभ राणे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना व्यक्त करत मिरारोडमध्ये शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले. शहीद मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव बुधवारी श्रीनगर येथून विमानाने दिल्लीला पोहोचले आणि मालाड येथील शवगृहामध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटे शहीद राणे यांचे पार्थिव मिरारोड येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. शहीद मेजर कौस्तुभ यांच्यावर मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बुधवारी शहीद कौस्तुभ यांच्या निवासस्थानी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार त्यांच्या घरी दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -