घरदेश-विदेशसरकार देतंय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी

सरकार देतंय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी

Subscribe

सार्वभौम गोल्ड बाँड योजना २०२०-२१ चा तिसरा टप्पा सोमवारी ८ जून २०२० रोजी गुंतवणुकीसाठी सुरु होणार आहे.

सरकार स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. सार्वभौम गोल्ड बाँड (सार्वभौम सुवर्ण रोखे) योजना २०२०-२१ चा तिसरा टप्पा सोमवारी ८ जून २०२० रोजी गुंतवणुकीसाठी सुरु होणार आहे. १२ जून २०२० पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. सरकार २० एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये गोल्ड बाँड जारी करणार, असं केंद्रीय बॅंकेने एप्रिलमध्ये जाहीर केले होतं. आरबीआय सरकारच्या वतीने २०२०-२१ मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड जारी करणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील सोन्याच्या बाँडसाठी आरबीआयने प्रति ग्रॅम ४,६७७ किंमत निश्चित केली आहे. आरबीआयने म्हटलं आहे की, “सदस्यता कालावधीपूर्वी तीन व्यापार सत्रात (३ जून ते ५ जून २०२०) २४ कॅरेट सोन्याच्या क्लोजिंग किंमतीच्या सरासरीच्या आधारे बाँडची नाममात्र किंमत ४,६७७ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली गेली आहे.” आरबीआयने म्हटलं आहे की जे लोक सार्वभौम गोल्ड बाँडसाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करुन पेमेंट करणार त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळेल. अशा गुंतवणुकदारांसाठी किंमत प्रति ग्रॅम ४,६२७ रुपये असेल.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: भारतात ऑक्सफोर्ड निर्मित लसीचे उत्पादन सुरू, कोट्यवधी डोस तयार करणार


कोणाला गुंतवणूक करता येणार?

सार्वभौम गोल्ड बाँड आठ वर्षांसाठी दिले जातात. पाचव्या वर्षानंतर आपल्याला या बाँड योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय मिळेल. भारतीय नागरिक, ट्रस्ट, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या बाँड खरेदी करू शकतात.

- Advertisement -

किती बाँड खरेदी करता येणार?

या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याचं बाँड खरेदी करता येणार आहे. आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त चार किलोग्रॅमपर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करता येऊ शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -