‘नरेंद्र मोदींना मत द्या’ लग्न पत्रिकेतून नवऱ्याची अजब मागणी

मला माहित आहे प्रचंड लोक मोदींच्या विरोधात आहेत पण मी मोदींचा चाहता आहे. मी माझ्याबाजूने मोदींना सहाय्य करण्यासाठी माझ्या ऑफिसमधील स्वच्छ भारत मोहिमेत देखील भाग घेतला आहे.

Hyderabad
Mukesh Yande's wedding card
मला असं वाटतं मोदींच्या हाती आपला देश सुरक्षित आहे

आपण बरेचदा पाहिले आहे, लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर ‘कृपया आहेर आणू नये’, असे लिहिलेले असते. पण हैद्राबादमधील एका नवऱ्यामुलाने लग्न पत्रिकेमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘मोदींना मत द्या’, अशी विनंती केली आहे. सोशल मिडीयावर या लग्न पत्रिकेचा फोटो व्हायरल झाला आहे. व्हॉटस्अ्ॅपवर देखील ही पत्रिका मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. वधु-वर यांच्या पालकांनी लग्नपत्रिकेखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपले मत मोदीजींना द्या, हीच आमच्यासाठी उत्कृष्ट भेट ठरेल, अशी विनंती केली आहे. मुकेश यांडे या २७ वर्षीय तरुणाने आपल्या लग्नाच्या माध्यमातून मोदींजीचा प्रचार केला आहे. हा तरुण तेलंगणा जनरेशन कॉर्पोरेशन येथे नोकरी करत असल्याचे समोर आले आहे.

मला माहित आहे अनेक लोक मोदींच्या विरोधात आहेत. पण मी मोदींचा चाहता आहे. मी माझ्यापरिने मोदींना साहाय्य करण्यासाठी माझ्या ऑफिसमधील स्वच्छ भारत मोहिमेत देखील सहभाग घेतला होता. आपल्या आवडत्या नेत्याचा प्रचार करण्यासाठी आपण अशा काही मोहिमेमध्ये भाग घेऊन त्यांना पाठिंबा देऊ शकतो, असे त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. एवढंच नव्हे तर तो स्वत:ला मोदी भक्त देखील म्हणतो.

माझं मत मोदींना

तेलंगणा सरकारला मुकेशने केलेले हे कृत्य तितकेसे आवडलेले दिसत नाही आहे. पण मुकेशनुसार तो तेलंगणा सरकारला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. पण जेव्हा लोकसभा निवडणूक येईल तेव्हा मी मोदींना माझे मत देणार असे तो ठामपणे सांगतो. मला असे वाटते मोदींच्या हाती आपला देश सुरक्षित आहे आणि हळूहळू आपला देश प्रगतीच्या दिशेने जात आहे, म्हणून मी त्यांच्यासाठीच प्रचार करणार, असे त्याने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here