भारतीय पुरातत्व विभागाचा ५७४ पानांचा अहवाल ठरला महत्त्वपूर्ण

Mumbai
supreme court
सर्वोच्च न्यायालय

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात भारतीय पुरातत्त्व विभागाचा 574 पानांचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला आहे.

हा अहवाल जवळपास 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 12 मार्च पासून 7 ऑगस्ट 2003 मध्ये पुरातत्त्व विभागाने तयार केला होता. यावेळी भारतीय पुरातत्त्व विभागाला खोदकाम करताना अनेक गोष्टी सापडल्या. हे खोदकाम करतेवेळी त्या ठिकाणी 14 तज्ज्ञ उपस्थित होते. यासर्व तज्ज्ञांनी याचा विस्तृत रिपोर्ट, फोटोग्राफ, नकाशे आणि चित्र कोर्टासमोर ठेवले.

भारतीय पुरातत्त्व विभागाला वादग्रस्त जमिनीवरील भिंतीवर विविध कलाकृती बनवण्यात आल्या होत्या. पुरातत्त्व विभागाने खोदकाम करताना 20 फूट खाली जवळपास 1500 वर्षापूर्वीची हजारो गोष्टी मिळाल्या. तसंच 30 पेक्षा जास्त खांबांचे आधारही मिळाले होते. या सर्वाचे वैज्ञानिक दृष्ट्याही परीक्षण झाले होते. खोदकाम आणि वैज्ञानिक परिक्षणाद्वारे रिपोर्टनुसार वादग्रस्त वास्तूखाली पुरातन मंदिरचा अवशेष होते.

वादग्रस्त वास्तूच्या बरोबर खाली एक मोठी वास्तू होती. या ठिकाणी दहाव्या शतकापासून काही बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरु होता. खोदाकामादरम्यान जे अवशेष मिळाले आहेत, त्यानुसार या ठिकाणी उत्तर भारतातील एक मंदिर असल्याचे संकेत मिळत आहे. इतकंच नव्हे तर दहाव्या शतकातील वैदिक काळातील काही मुर्ती आणि इतरही वस्तू या ठिकाणी उत्खननादरम्यान मिळाल्या आहेत. यात शुंग काळातील चुन्याची भिंत आणि कुषाण काळातील एखादी मोठी वास्तूचाही समावेश आहे. असे भारतीय पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय या वादग्रस्त ठिकाणी 1 ऑगस्ट 2002 ते 23 ऑक्टोबर 2002 या काळात रेडिओलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले. तोजो विकास इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनेही सर्वेक्षण केले होते. यात वादग्रस्त जमिनीच्या आत काही विसंगती आढळून आल्या. यानंतर इलाहाबाद हायकोर्टाने 5 मार्च 2003 रोजी खोदकाम करण्यात आदेश देण्यात आले. 12 मार्चपासून 07 ऑगस्ट 2003 पर्यंत या वादग्रस्त जमिनीचे खोदकाम झाले.

पुरातत्त्व विभागाच्या खोदकामाचा संपूर्ण अहवाल 25 ऑगस्ट 2003 रोजी हायकोर्टात दाखल करण्यात आला. यावेळी हायकोर्टाने वादग्रस्त ठिकाणी नेमकं मशिद होती की मंदीर असा प्रश्न उपस्थित केला. रेडिओलॉजिकल सर्वेक्षणानुसार यात काही विसंगती आढळतात. यात सर्वेक्षणाच्या आधारानुसार वादग्रस्त वास्तू आत काही वस्तू, खांब, भिंती, स्लॅब, जमीन असल्याचे दिसत आहे.

पुरातत्त्व विभागाच्या अहवालानुसार वादग्रस्त वास्तूच्या खाली नक्षीदार वीटा, काही देवी देवतांच्या मूर्ती, नक्षीदार वास्तूशिल्प, पानांचे गुच्छ, दरवाजाचा काही भाग, गोलाकार आकाराचे पुजास्थळ असलेली जागा या गोष्टी सापडल्या. त्याशिवाय उत्तरेच्या दिशेला शंकराचे एक मंदिर होते. त्या मोठ्या गोलाकार वास्तूला 50 खांब्यांचा आधार देण्यात आला होता आणि ही उत्तर भारतीय मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

या अहवालात पूजा करण्याचे क्षेत्र हे गोलाकार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या खोदकामादरम्यान विटांनी तयार करण्यात आलेले गोलाकार पूजा स्थळ मिळाले. याचा आकार इंग्रजी शब्दाच्या V आकाराप्रमाणे असल्याचेही स्पष्ट होत आहे.

अयोध्या राम जन्मभूमीच्या खोदकामादरम्यान गुप्त, उत्तर गुप्त काळ आणि कुषाण काळातील काही अवशेष सापडले आहेत. याठिकाणी गुप्त आणि कुषाण काळातील भिंती आहे. कुषाण काळात बनवण्यात आलेल्या कोणत्याही इमारती भव्य-दिव्य असायच्या. तसेच चुन्यापासून बनवलेल्या भिंतीही येथे आढळल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here