घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट५ देशांच्या गुप्तचर संस्थांनी वुहानचं रहस्य उलगडलं; चीनने कोरोना तयार केल्याचा दावा

५ देशांच्या गुप्तचर संस्थांनी वुहानचं रहस्य उलगडलं; चीनने कोरोना तयार केल्याचा दावा

Subscribe

कोरोनाचं सत्य बाहेर आणण्यासाठी जगातील पाच प्रमुख देशांच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत.

लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम चीनच्या वुहान प्रांतातील एका लॅबमधून झाल्याचा आरोप जगभरातील अनेक देश करत आहे. कोरोनाचं सत्य बाहेर आणण्यासाठी जगातील पाच प्रमुख देशांच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत. यासाठी या गुप्तचर संस्थांनी ‘ऑपरेशन ५ आईज’ (Operation 5-Eyes) सुरू केलं आहे. या ऑपरेशनद्वारे काही कागदपत्रे तयार केली असून यात वुहान मधुन जगभरात कोरोना कसा पसरला याबाबतची माहिती दिली आहे.

अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’, ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय-6’ यासह अजून तीन देशांच्या गुप्तचर संस्थांनी चीनचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा विडा उचलला आहे. या ऑपरेशनचे नाव ‘ऑपरेशन 5 आईज’ (Operation 5-Eyes) असं ठेवण्यात आलं आहे. पहिल्यांदाच एकाच वेळी पाच देशांच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्था कोरोना पसरण्यात चीनचा हात आहे का? वुहान लॅबचे रहस्य काय आहे? चीनने जगाला माहिती देण्यास वेळ का लावला? याबाबत खुलासा करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वादग्रस्त ट्विट निलेश राणेंना भोवलं, तृतीयपंथी समाजाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल


 

- Advertisement -

‘५ आईज’ हे पाच देशांच्या गुप्तचर संस्थांचे नेटवर्क असून यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि इंग्लंडच्या गुप्तचर संस्था एकत्र आल्या आहेत. दरम्यान, या नेटवर्कने काही कागदपत्र तयार केली असून यामध्ये वुहान मधुन जगभरात कोरोना कसा पसरला याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. १५ पानांचा अहवाल आहे. हा अहवाल ‘द डेली टेलीग्राफ’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केला आहे.

या आहेत ५ गुप्तचर संस्था

अमेरिका – सीआयए
इंग्लंड – एमआय-६
ऑस्ट्रेलिया – एएसआयएस
न्यूझीलंड – एनझेंडएसआयएस
कॅनडा – सीएसआयसी

या अहवालात काय आहे?

या अहवालात कोरोनाबाबत काही खुलासे करण्यात आले आहेत. पहिला खुलासा हा वुहानच्या लॅबमध्ये वटवाघूळ आणि अन्य प्राण्यांवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत आहे. वुहान लॅबमध्ये ५० प्रकारचे विषाणू आहेत. चीन जाणूनबुजून ते अधिक घातक बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा करण्यात आला आहे. दुसरा खुलासा या लॅबमध्ये तयार होत असलेल्या विषाणूबाबत आहे. ‘५ आईज’च्या लिक झालेल्या कागदपत्रात वुहान लॅबमध्ये ‘सार्स’ सारखे अनेक जीवघेणे विषाणू बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. तिसरा खुलासा चीनने सॅम्पल लपवल्याबाबत आहे. चीनने ‘मर्स’ आणि ‘सार्स’ प्रमाणे कोविड-१९ विषाणूची माहिती जगापासून लपवली. ज्या डॉक्टरांनी, पत्रकारांनी याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला त्यांना गायब केलं. चौथा खुलासा पेशंट झिरो गायब करण्याबाबत आहे. वुहान येथील लॅबमध्ये काम करणारी इंटर्न वो ह्वांग यान लिंग हिला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिला पेशंट झिरो असं बोललं जातंय. मात्र चीनने तिलाच गायब केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -