घरदेश-विदेशसंपूर्ण देशाची भाषा हिंदी असावी!

संपूर्ण देशाची भाषा हिंदी असावी!

Subscribe

एकाच देशात अनेक भाषा बोलल्या जाणे हे कौतुकास्पद आहे. मात्र संपूर्ण देशाची एक हिंदी भाषा असावी, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. आपल्या देशात हिंदी ही राष्ट्राची भाषा व्हायला हवी, अशी इच्छा स्वातंत्र्यसैनिकांचीही होती. परकिय भाषांचे आपल्यावर आक्रमण होऊ नये, असे स्वातंत्र्यवीरांना वाटत होते, असेही शहा म्हणाले. हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र शहा यांच्या या विधानावर देशातील राजकीय नेत्यांनी भाषेबाबत आपली संमिश्र मते व्यक्त केली आहेत. डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी शहा यांचे हिंदी भाषेबाबतचे विधान स्थानिकांवर अन्याय करणारी हिंदी भाषा आमच्यावर थोपवली जाऊ शकत नाही.

असे म्हटले आहे. शहा यांचे विधान देशाच्या एकतेत बाधा आणणारे असून त्यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, असेही स्टॅलिन म्हणाले. तर एमआयएमचे असुदुद्दीन ओवेसी यांनीही शहांवर टीका केली आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 29 नुसार प्रत्येक नागरिकाला त्याची भाषा आणि संस्कृती निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अमित शाह यांनी भाषेविषयी केलेले विधान हे सांप्रदायिक असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे.

- Advertisement -

हिंदी ही देशाची मातृभाषा नाही, देशात अनेक मातृभाषा असलेले लोक राहतात. या विविधतेचा सन्मान शहा यांनी करायला हवा, असेही ओवेसी म्हणाले. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेसंदर्भात ट्विट करून हिंदी भाषा दिवसाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र देशात अनेक भाषा, संस्कृती आहेत, त्या प्रत्येकाचा योग्य सन्मान झाला पाहिजे, आपण नवी भाषा शिकलो तरीही आपली मातृभाषा कधीही विसरता कामा नये, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -