‘या’ नॅशनल शुटरची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या!

उत्तर प्रदेश येथील बरेली मधील बिहारीपुर येथे राहणारे शिशुपाल यादव यांची मुलगी लवी यादव (२४) हिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Baraily
The National Shooter has committed suicide

उत्तर प्रदेशातील एका नॅशनल शुटर युवतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी ही घटना घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रविवारी युवतीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. शुक्रवार पासून तिच्याशी कोणताही संपर्क झाला नसून, पीडितेचा मोबाईल बंद असल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेश येथील बरेली मधील बिहारीपुर येथे राहणारे शिशुपाल यादव यांची मुलगी लवी यादव (२४) हिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. लवी एक नेमबाज होती. तिने बेरोजगारीच्या कारणाने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेत. पीडितेने मीरगंज येथील आरपी डिग्री कॉलेज मधून बीपीएडीचे शिक्षण पूर्ण केले होते. लवी आपल्या कुटुंबासह रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रामपुर येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती. पीडितेची आई तेथील एका आंगणवाडीत काम करते. विविह सोहळ्यानंतर पीडितेचा भाऊ आणि वडिल सोमवारी आपल्या राहत्या ठिकाणी परत आले आणि नंतर मंगळवारी ते पुन्हा रामपूर येथे गेले होते.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, ‘गुरूवारी तिच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर तिच्याशी पुढे संपर्क झाला नाही’, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या भाच्याने सांगितले की, ‘रविवारी लवी फोन उचलत नव्हती; त्यानंतर अधिक चिंताजनक परिस्थिती उद्भवल्याने ते रविवार संध्याकाळी बरेलीला पोहोचले. दरवाजा आतमधून बंद असल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली’. पोलीसांनी दार तोडल्यावर पीडितेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांना घटनास्थळी पीडितेचा मोबाईल फोन सापडला असून, त्या द्वारे पोलीस घटनेचा अधिक तपास घेत आहेत. मात्र नेमबाज असणाऱ्या लवीने बेरोजगारीच्या कारणाने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.