घरCORONA UPDATECorona : धोका अजून टळलेला नाही, पुढेही जपा; WHO चा इशारा

Corona : धोका अजून टळलेला नाही, पुढेही जपा; WHO चा इशारा

Subscribe

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असताना पुढील काही महिने अधिक धोक्याचे असून लोकांना जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. काही देशांमध्ये कोरोनामुळे भयानक परिस्थितीत निर्माण झाली असून हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी भयानक होण्याची शक्यता आहे, WHO कडून वर्तवण्यात आली आहे.

या संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहॉलम यांनी काल, शुक्रवारी पत्रकार परिषद घेत संपूर्ण जगाला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्त सतर्क राहण्याचा तलेत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण जग, विशेषत: उत्तर गोलार्ध गंभीर टप्प्यावर आला असून अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येणारे काही महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे. तसेच त्यातील जगभरातील सर्व देशाच्या नेत्यांना कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

टेड्रोस एडहॉलम यांनी जगभरातील सर्व देशाच्या नेत्यांना कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आता पुन्हा शाळा, महाविद्यालये, कंपन्या बंद होऊ नये आणि कोरोनामुळे आणखी जास्त लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी टेड्रोस यांनी योग्य कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जे सांगितलं होतं तेच पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे, असं म्हणत टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले महासंचालक

अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोना संक्रमनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे अधिक आहे. काही देशांमध्ये ऑक्टोबर महिन्यात तर रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही महिने जास्त चिंताजनक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी टेस्टची क्षमता वाढवावी, जेणेकरुण बाधितांना तातडीने उपचार मिळेल. याशिवाय त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावणार नाही, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Video : मुंबईत ट्रॅफिक पोलिसाला महिलेच्या अर्वाच्च्य शिव्या; व्हिडिओ व्हायरल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -