सलग ३७ दिवस बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त राहण्याचा कल ३७ व्या दिवशीही कायम राहिला आहे.

first time mumbai patient doubling rate over century has passed

२४ तासात ४५ हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली असून, सलग ३७ दिवस बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात ४८,४०५ रुग्ण बरे झाले आहेत. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त राहण्याचा कल ३७ व्या दिवशीही कायम राहिला आहे. कोविड संदर्भातल्या सूचनांचे योग्य पालन करण्याबाबतचे जनआंदोलन यशस्वी ठरत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णसंख्येचा आलेख घटता राहिला आहे.

सक्रीय रुग्णांची संख्या भारतात कमी होत असून सध्या ही संख्या ५.०९ लाख आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या ५,०९,६७३ आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याने बरे होण्याचा दर आता ९२.५६ टक्के आहे. बरे झालेल्यांची संख्या ७९,१७,३७३ आहे. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर वाढून ७४,०७,७०० झाले आहे. नव्या रुग्ण संख्येत घट होत असल्याने भारताचा पॉझिटीव्हिटी दरही घटत आहे. मात्र चाचण्या करण्यासाठीचे केंद्र आणि राज्य सरकारचे प्राधान्य कायम आहे. भारताचा पॉझिटीव्हिटी दर कमी होऊन हा दर ७.१९ टक्के आहे. बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली आहे. एका दिवसात ८,२३२ रुग्ण बरे झाले आहेत. केरळमध्ये ही संख्या ६,८५३ तर दिल्लीमध्ये ही संख्या ६,०६९ होती. नव्या रुग्णांपैकी ७९ टक्के रुग्ण १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. दिल्लीमध्ये सर्वात जास्त म्हणजे ७,७४५ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर महाराष्ट्रात ५,५८५ आणि केरळ मध्ये ५,४४० नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.