‘पबजी’ गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम

पबजी गेममुळे जम्मूतील एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सलग दहा दिवस तो पबजी गेम खेळत राहिला आणि त्यामुळे त्याच्या वागणूकीत बदल होत गेले. तो हिंसक बनला, घरातील लोकांवर धावून जावू लागला. अखेर, तो बेशुद्ध पडला.

Jammu
The 'PUBG' game affects the young heads
'पबजी' खेळामुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम

‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) या खेळामुळे एका तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत आहेत. या खेळांनी आता मनोरंजनाच्या सीमा ओलांडल्या असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेतताना दिसत आहे. ‘ब्लू व्हेल‘, ‘पॉकिमॉन गो’ हे त्याचेच एक मोठे उदाहरणे आहेत. ‘ब्लू व्हेल’ या गेमने तर जगभरात धुमाकूळ घातला. या गेमचे शेवटचे चॅलेंज हे आत्महत्या करण्याचे असते. आत्महत्या नाही केली, तर मोबाईलवर धोकादायक असे मॅसेजेस येतात, ज्यामुळे लहान मुले बिथरतात आणि ते आत्महत्या करतात. ‘पॉकिमॉन गो‘ या खेळाने तर तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. ‘पॉकिमॉन’ शोधण्याच्या भानगडीत कित्येक तरुणांनी आपला जीव देखील गमावला आहे. आता या दोन गेम्सनंतर सध्या हवा आहे, ती पबजी गेमची! या गेम्सचे वाईट पडसाद जाणवायला लागले आहेत. त्यातील जम्मू येथे पबजी गेम खेळणाऱ्या तरुणासंदर्भातली घटना हे मोठे उदाहरण आहे.

हेही वाचा – ३० हजार पबजी प्लेअर्सना केले हॅक, जाणून घ्या कारण

रुग्णालयात दाखल झालेला तरुण जीम ट्रेनर

पबजी खेळल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेला हा तरुण जीम ट्रेनर आहे. तो पबजी खेळण्याच्या नादात गेल्या दहा दिवसांपासून जीमला गेलाच नाही. तो सतत दहा दिवस पबजी गेम खेळत राहिला. सुरवातीला त्याचे असे वागणे घरच्यांना सामान्य वाटायचे. परंतु, नंतर तो हळूहळू चिडचिड करु लागला. घरातील लोकांच्या अंगावर धावून जाऊ लागला. त्याचं हिंसक वागणं फार तीव्र झालं आणि अचानक तो बेशुद्ध झाला. त्यामुळे घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याचे समुपदेशन सुरु आहे. या गेमचे परिणाम बऱ्याचदा समोर आले आहेत. तरीदेखील लोक याकडे दुर्लक्ष करतात. पबजी गेमची लोकप्रियता देशात आजही वाढताना दिसत आहे. पंरतु, या घटनेतून अशाप्रकारचे गेम्सला किती प्राधान्य द्यावे, याची जाणीव होणे गरजेचे आहे. पालकांनी अशा गेम्सपासून आपल्या पाल्यांना लांब ठेवणे गरजेचे आहे.


हेही वाचा – राज्यातही PUBG गेमचा विळखा, पालक त्रस्त