नीट परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

niit result

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.

देशात १३ सप्टेंबरला जवळपास ३८४३ परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा जवळपास १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९० टक्के विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) नीट २०२० चा निकाल अधिकृत संकेतस्थळावर ntaneet.nic.in वर जाहीर करणार अराहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे.

कसा पाहाल नीटचा निकाल

  • सर्वप्रथम नीटच्या ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
  • नीट अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन सबमिट करा
  • नीट २०२० चा निकाल आपल्या स्क्रिनवर दिसेल