घरदेश-विदेशवडिलांच्या अंत्यविधीनंतर बजावला मतदानाचा हक्क

वडिलांच्या अंत्यविधीनंतर बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमध्ये मतदान होत आहे. एकूण ५१ मतदारसंघात हे मतदान सुरू आहे. या पाचव्या फेरीत ६७४ उमेदवार भविष्य आज मतदान पेटीत कैद होणार आहे. ८ कोटी ७५ लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजवणार आहेत. या मतदानादरम्यान एका अशी घटना घडली की ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. आजपर्यंत लग्न लागल्यावर, लग्न होण्या आधी मतदान केलं अशा अनेक बातम्या आपण ऐकल्या, बघितल्या आहेत. पण यावेळी अशा एका व्यक्तीने मतदान केलं की उपस्थितांचेही डोळे पाणावले.


मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे वडिलांचा अत्यंविधी केल्यानंतर मुलाने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याच्या या मतदान करण्यामुळे एका नवीन संदेश सगळ्यांना मिळाला आहे. पुन्हा एकदा मतदान किती महत्त्वाचं आहे हे या वरून सिध्द झालं आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील देशातील सात राज्यांमध्ये ५१ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. या टप्प्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जयंत सिन्हा, राजवर्धनसिंह राठोड, अर्जुनराम मेघवाल आणि कृष्णापल गुर्जर यांच्यासह अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य या टप्प्यात निश्चित होणार असल्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -