घरCORONA UPDATEभारतात कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या लवकरच सुरू होणार - आरोग्य मंत्रालय

भारतात कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या लवकरच सुरू होणार – आरोग्य मंत्रालय

Subscribe

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने आज, मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलासादायक माहिती दिली आहे. भारतीय बायोटेकच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच ऑक्सफोर्डच्या लसीची चाचणीदेखील तिसऱ्या टप्प्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या चाचणीचे निकाल नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये येण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

लस विकत घेण्याबाबत आरोग्य मंत्रालयाचे सचिव यांनी सांगितले की, लस बनवणाऱ्यांना प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये योगदान करण्याकरता आर्थिक मदत केली जाईल. तसेच इतर पर्यायांवरही विचार केला जाईल. सिंगल डोज आणि डबल डोज लसीवरही प्रयोग सुरू आहेत. त्यांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत बोलताना सांगितले की, यामध्ये १० टक्के रुग्ण हे २६ ते ४४ वयोगटातील होते. तर ३५ टक्के रुग्ण हे ४५ ते ६० वयोगटातील होते.

दरम्याव, जगभरात कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाच्या १० लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी कोणती ना कोणती लस २०२० च्या अखेरपर्यंत किंवा २०२१ च्या सुरुवातीला या लस यशस्वीपणे नोंदणीकृत होईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona: GCC Biotech चे आरटी पीसीआर किटस् सदोष- राजेश टोपे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -