घरताज्या घडामोडीCOVID 19 tests : देशात आतापर्यंत १ कोटी ७७ लाखाहून अधिक चाचण्या!

COVID 19 tests : देशात आतापर्यंत १ कोटी ७७ लाखाहून अधिक चाचण्या!

Subscribe

देशभरात २४ तासांत ४ लाखाहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ४ लाख ८ हजार ८५५ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

भारताचा जगात तिसरा क्रमांक

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. त्यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भारतानंतर अमेरिक (America) आणि ब्राझिलमध्येच (Brazil) कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर देशात आत्तापर्यंत ३४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

तर राज्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येप्रमाणे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ११७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० हजार ३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच २४ तासांत २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ४४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १४ हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जगात कोरोनाचा विस्फोट! आतापर्यंत १ कोटी ६८ लाख ९२ हजारांहून अधिक बाधित रूग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -