घरCORONA UPDATEअमेरिका-चीनने वाद थांबवून जागतिक महामारीकडे लक्ष द्यावे; जी २० देशांच्या प्रतिनिधींचे आवाहन

अमेरिका-चीनने वाद थांबवून जागतिक महामारीकडे लक्ष द्यावे; जी २० देशांच्या प्रतिनिधींचे आवाहन

Subscribe

सर्वांनी एकजुटीने सामोरे जाऊ या, असं सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी म्हटलंय.

कोविड- १९ या विषाणूबाबत अमेरिका आणि चीन यांच्यात जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, त्यांनी तातडीने ते थांबवून ही जागतिक महामारी कशी रोखायची यावर एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन जी २० देशांतील प्रतिनिधींनीं गुरुवारी रात्री करोना विषाणूच्या संसर्गावर होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंगच्या पूर्वी केले. हा विषाणू जागतिक पातळीवर वेगात पसरत आहे. जगातील ४ लाख ७० हजार जणांना याचा संसर्ग झाला आहे. २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus: गोरगरीब जनतेला पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत देणार

- Advertisement -

मानव जातीसाठी हे संकट असून यावर सर्वांनी एकत्र येऊन समान धोरण ठरवावे, हे महामारी रोखण्यासाठी एकमेकांचे अनुभव, माहिती यांचे आदाण प्रदान करावे, असे सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी म्हटले आहे. ते या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत. या जागतिक महामारीमुळे जगातील सर्व देशांसमोर वैद्यकीय आणि आर्थिक आव्हान उभे राहिले आहे, त्याला सर्वांनी एकजुटीने सामोरे जाऊ या, असे राजे सलमान म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -