घरदेश-विदेशपतीच्या विरोधात पत्नीने पोलिसात केली तक्रार

पतीच्या विरोधात पत्नीने पोलिसात केली तक्रार

Subscribe

पतीने दोघांच्या शारिरिक संबंधाचे व्हिडिओ करून पत्नीला तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

नवऱ्याने दोघांच्या शारिरिक संबंधाचे मोबाईलवर व्हिडिओ केल्याने त्याच्या विरोधात पत्नीने बारादारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. हे जोडपे उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राहत होते. पत्नीने हा व्हिडिओ डिलीट करायला सांगितले पण पतीने तो व्हिडिओ डिलीट केला नाही. तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी पतीने दिली. त्यामुळे तिने ३० जूनला सासर सोडले आणि ती माहेरी निघून गेली. सात जुलैला तिने बारादारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.

पत्नीने तक्रारीत असं म्हटलं आहे की, मी हा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करणार म्हणून सांगितलं. पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन मला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. मला सतत तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देखील दिली.

- Advertisement -

२९ ऑक्टोबर २०१९ रोजी या तक्रार करणाऱ्या महिलेचा विवाह झाला होता. जेव्हा पत्नीने पतीकडे व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली. तरी देखील पतीने तो व्हिडिओ डिलीट केला नाही. म्हणून तिने तो व्हिडिओ डिलीट केला. तर नवऱ्याने जबरदस्तीने पुन्हा लैंगिक संबंध करून त्याचा व्हिडिओ बनवला. या सर्व घटनेबद्दल जेव्हा तिने सासू-सासऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाची बाजू घेतली. सध्या पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केले नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -