घरताज्या घडामोडी'या' तीन गोष्टींमुळे चीनला मिळाले करोनाविरोधात यश; 'WHO'ने सांगितले सत्य

‘या’ तीन गोष्टींमुळे चीनला मिळाले करोनाविरोधात यश; ‘WHO’ने सांगितले सत्य

Subscribe

चीनने कोरोनाविरोधात यश मिळवले असून याचे WHO ने सत्य सांगितले आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरातील २०० देश अक्षरश: हैराण झाले आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे चीनने कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चीनने कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी लस विकसित केली असून नागरिकांना गुप्तपणे दिली जात असल्याचा आरोप देखील अनेक देशांनी केला. मात्र. याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सत्य सांगितले असून त्यामुळेच चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे समोर आले आहे.

WHO ने सांगितले सत्य

जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड यांनी ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, ‘चीनमध्ये मागील सलग २० दिवसांपासून एकही नवीन स्थानिक कोरोनाबाधित आढळला नाही. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कोविड-१९ महासाथी दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या पथकासोबत चीनचा दौरा केला होता. तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे चीनला कोरोनाविरोधात मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या आहेत त्या तीन गोष्टी

ब्रुस यांनी सांगितले की, ‘चीनने राष्ट्रीय स्तरापासून ते प्रांत आणि शहरांच्या समुदायापर्यंत एक आरोग्य यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेमुळे माहिती आणि अनुभवाचे आदान-प्रदान करणे सोपे जात आहे. या आरोग्य व्यवस्थेने कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत चीनच्या लोकांनी देखील या लढाईत आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखली असून ती अगदी व्यवस्थित पार पाडली आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांनी विविध स्तरांवर सजग राहून घेतलेले निर्णय आणि बजावलेले कर्तव्य महत्त्वाचे ठरले आहे. या तीन गोष्टींच्या आधारे चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे.


हेही वाचा – NEET Exam : सुप्रीम कोर्टाचा परीक्षा पुढे ढकलण्यास नकार; वेळापत्रकानुसार होणार परीक्षा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -