बंगळुरूत ४ हजार ७०० किलो कांद्यांची चोरी!

कर्जाचा डोंगर दूर करण्यासाठी चोर विविध मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतो. पण बंगळुरूत चोरांनी चक्क कांद्यांवर डल्ला मारला आहे.

Bengaluru
onion prices

कर्जाचा डोंगर दूर करण्यासाठी चोर विविध मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतो. पण बंगळुरूत चोरांनी चक्क कांद्यांवर डल्ला मारला आहे. या चोरांनी तब्बल ४ हजार ७०० किलो कांदे चोरले आहेत. या प्रकरणातील संशयित ट्रक चालक फरार असून ट्रकचे थकीत कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केली असावी असा पोलिसांचा कयास आहे.

गस्तीवरील महिला पोलिसाला आला संशय

बेंगळुरूतल्या तवारेकेरे पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक यांना दोन दिवसांपूर्वी गस्तीवर असताना एका रस्त्याशेजारी एक ट्रक उभा केलेला दिसला. त्यांना संशय आला. म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की ट्रकमध्ये भरलेल्या कांद्याच्या निम्म्या गोणी गायब आहेत. यावेळी अन्य पोलिसांच्या मदतीने त्यांनी ट्रक चालक आणि त्याच्या सोबत्यांची चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा – कांद्याची आयात करणं ही केंद्र सरकारची चूक – शरद पवार

अशी केली कांद्याची चोरी

गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांनी कांद्याची चोरी कशी केली याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, हिरियूरमध्ये आम्ही कांद्याच्या ८१ गोणी उतरवल्या. त्यानंतर शहरात बाजारात नेण्यासाठी त्या गोणी दुसऱ्या गाडीत भरल्या. ट्रक जाणूनबुजून ढकलून दिल्याची कबुली ट्रकचालक संतोष कुमार आणि चेतनने दिली. ट्रकमध्ये तब्बल ४ हजार ७०० किलो कांदे होते. याप्रकरणी कांदा व्यापारी शेख अली याच्यासह त्याच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान घटनेतील मुख्य संशयित असलेला ट्रक मालक चेतन फरार आहे. दरम्यान पोलिसांनी कांदे ताब्यात घेतल्यानंतर ते कांदा व्यापारी आनंद कुमार यांना देण्यात आले.