दिल्ली पेटली असतानाही जागली माणुसकी, हिंदूनी दिला मुस्लीम बांधवाना आधार !

दिल्लीच्या ईशान्य भागातील हिंसाचारादरम्यान मुस्लीमांची घरे आणि त्यांच्या वस्त्या उध्वस्त केल्या. मात्र ईशान्य दिल्लीतील अशोक नगर येथील हिंदूनी मुस्लीम बांधवाना आधार देत त्यांना राहण्यासाठी घरे दिली.

New Delhi
delhi riots
हिंदु मुस्लिम एक्याचे दर्शन

दिल्लीतील ईशान्य भागातील हिंसाचारात मुस्लीमांची घरे आणि त्यांच्या वस्त्या उध्वस्त केल्या. पण दिल्लीतल्या काही भागात समाजापुढे आदर्श उदाहरण ठेवतानाच माणुसकीचा विजय झाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. एकीकडे झोपड्या जळत होत्या, घरे उद्ध्वस्त होत होती. अनेक संसार बेचिराख झालेले असतानाच, लोक बेघर झालेले असताना मात्र ईशान्य दिल्लीतील अशोक नगर येथील रहिवाशांनी मुस्लीम बांधवाना आधार देत त्यांना राहण्यासाठी घरे दिली. दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यात बुधवारी पोलीस आणि निमलष्करी दलाला काहीसे यश आले आहे. या हिसांचारात बळी गेलेल्यांची संख्या २७ झाली असून, जखमींची संख्या २०० वर गेली आहे.

हजार लोकांच्या जमावाने केला जाळपोळ 

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बादी मशिदीजवळ १००० लोकांचा जमाव अचानक कॉलनीत घुसला. त्यावेळी २० लोक मशिदीत नेहमीप्रमाणे प्रार्थना करीत असताना जमावाने शिरकाव केला. अचानक लोकांचा मोठा समूह आत शिरला आणि जोरदार घोषणा देऊ लागला. लोकांनी जीव वाचवण्यासाठी तिथून धावपळ सुरू केली. त्यामध्ये बरेच लोक जखमीही झाले. जमावाने मशिदीची तोडफोड केली आणि जाळपोळ केला. त्यानंतर जमावाने दुपारी दीडच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर गच्चीवर जाऊन तिरंगा फडकावला. त्यानंतर बुधवारी स्थानिकांनी तिरंगा काढून टाकला. स्थानिकांनी परिसरातील मालमत्तेचे नुकसान करू नका अशी विनंती केली असता जमावातील लोकांनी कोणाचेही एकले नाही.तसेच हे लोक परदेशी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र या सगळ्यात कौतुकास्पद बाब म्हणजे जेव्हा जमावाने हिंसाचारात त्यांची घरे व दुकाने जाळली तेव्हा हिंदु शेजार्‍यांनी त्यांना राहण्यासाठी बरीच घरे देऊन मदत केली.

दिल्ली हिंसाचारावर रोहित शर्माची प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर रोहित शर्माने दिल्ली सिंहाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत जो हिंसाचार होतोय तो काही योग्य नाही. रोहित शर्माने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.