घरदेश-विदेशवस्तू चोरुन चोराने मागितली माफी

वस्तू चोरुन चोराने मागितली माफी

Subscribe

मी गरीब असून मला पैशांची गरज होती. म्हणून मी तो लॅपटॉप चोरला. पण फोन आणि तुझे पैशांचे पाकिट मी चोरले नाही. तू विद्यापीठाचा विद्यार्थी आहेस हे कळले.

प्रवासात एखादी वस्तू हरवली तर ती परत मिळण्याची शाश्वती आपल्याला नसते. म्हणजे चोर ती वस्तू परत देईल असे कधीच होत नाही मुळात … पण एका चोराने चक्क वस्तू चोरली म्हणून माफी मागितली आहे. त्यामुळे ज्या माणसाची ती वस्तू चोरली गेली त्यालाच त्या चोराची दया आली. या इसमाने घडलेला हा सगळा प्रसंग ट्विट करत चोराची ही करुण कहाणी शेअर केली आहे.

नेमंक काय झालं?

इंग्लडमध्ये राहणाऱ्या स्टिव्ह व्हेलेंटाईन नावाच्या विद्यार्थ्याचा लॅपटॉप चोरांनी पळवला. हा विद्यार्थी तेथील विद्यापीठात शिकायला आहे. पण लॅपटॉप चोरीला गेल्यानंतर काहीच वेळात त्याला एक मेल आला. जे वाचून त्यालाही धक्का बसला आणि वाईट वाटले. या मेलमध्ये कोणतीही धमकी नव्हती तर चोरी केल्यामुळे मला माफ करा असा मजकूर होता.

- Advertisement -

काय आहे मेलमध्ये? 

मी गरीब असून मला पैशांची गरज होती. म्हणून मी तो लॅपटॉप चोरला. पण फोन आणि तुझे पैशांचे पाकिट मी चोरले नाही. तू विद्यापीठाचा विद्यार्थी आहेस हे कळले. तुझ्या लॅपटॉपमधील फाईल्स तुला पाठवत आहे. जेणेकरुन तुला अभ्यासाला अडथळा येणार नाही.

- Advertisement -

नेटीझन्समध्ये पिकला हशा

व्हेलेंटाईनने हा सगळा प्रकार ट्विट केल्यानंतर नेटीझन्समध्येही हशा पिकला. लोकांनी या चोराला चांगलचं ट्रोल केलं पाहा त्यातील काही गमतीशीर प्रतिक्रिया

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -