पर्रिकरांच्या अंत्ययात्रेत पाकिटमारांचा होता सुळसुळाट; १३ जणांना अटक

मनोहर पर्रिकरांच्या अंत्ययात्रेतील गर्दीचा फायदा घेत अनेकांनी हात साफ केले. याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांना ताब्यात देखील घेतले आहे.

Goa
Manohar Parrikar of funeral
पर्रिकरांची अंत्ययात्रा

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनासाठी झालेल्या गर्दी दरम्यान चोरीच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाच्या अंत्ययात्रे दरम्यान ३२ जणांचे खिसे कापण्यात आले आहेत. याप्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली आहे. अंत्ययात्रेच्या गर्दीचा फायदा घेत अनेकांनी हात साफ केले. याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांना ताब्यात देखील घेतले आहे.

पांढऱ्या कपड्यात होते चोर

पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून तसंच गोव्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण पणजीमध्ये आले होते. मोठी गर्दी असताना याच गर्दीचा फायदा चोरांनी घेतला. ज्या चोरांनी खिसे कापले ते सर्व गोव्या बाहेरचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व चोर पांढरा शर्ट घालून आले होते. भाई-भाई करत ते अंत्यदर्शनासाठी केलेल्या गर्दीत शिरले. पाकीट मारीवेळी काही लोकांनी त्यांना् ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. मात्र तोपर्यंत त्यांनी अनेकांची खिसे कापले होती.

१३ जणांना अटक 

भाजप मुख्यालय म्हणजे ज्या ठिकाणी पर्रिकरांचे पार्थिव अंत्यदर्शासाठी ठेवले होते त्याठिकाणी, कला अकादमीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मिरामार या तीन ठिकाणी त्यांनी हातसाफ केले होते. यामधील काही चोरांना पाकिट मारताना काही लोकांनी पकडले. चोरी करताना निदर्शनाल आल्यानंतर लोकांनी या चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असे एक, दोन नाही तर तब्बल १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here