घरदेश-विदेशझोपा काढण्यात चीनी सगळ्यात पुढे, भारतीय दुसऱ्या स्थानी!

झोपा काढण्यात चीनी सगळ्यात पुढे, भारतीय दुसऱ्या स्थानी!

Subscribe

भारतात महिला रोजगाराचे प्रमाण कमी

आर्थिक सहकार व विकास संस्थेने (OECD) केलेल्या संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की, चीनमध्ये प्रत्येक व्यक्ती ९ तासांपेक्षा जास्त झोपतो. अमेरिकेत दररोज अडीच तास दूरदर्शन पाहतात तर भारतातील लोक स्वतःची काळजी घेण्यासाठी ४५ मिनिट घालवतात. ब्रिटनमधील लोकांकडे दिवसातून पाच तासांपेक्षा मोकळा वेळ असतो. ऑर्गनाइजेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन एँड डेवलपमेंटने (OECD) सादर केलेल्या अहवालात जगातील देशांच्या कामाचे तास, झोपेचे, खाण्याचे तास आणि मोकळ्या वेळेबाबत माहिती दिली आहे. यासाठी, १५ ते ६४ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांची एक दिवसाची दिनचर्या नोंदविली गेली आहे. अवर वर्ल्ड इन डेटा अहवालानुसार ज्या देशात नागरिकांना मौजमजेसाठी मोकळा वेळ नसतो तेथील लोक अधिक नाखूष असतात. या आकडेवारीनुसार, लोक बाहेर खाणे, झोपणे, खेळायला जाणे यासारख्या मोकळ्या वेळात सर्वाधिक मजा घेतात.तर संगणकावर गेम्स खेळणे किंवा चित्रपट पाहणे. तसेच गृहपाठ करणे आणि नोकरी मिळवण्यामध्ये नागरिक नाखूष असल्याचे या अहवालात समोर आले आहे.

ज्या देशांमध्ये लोक जास्त काम करतात आणि ज्या लोकांकडे मौजमजेसाठी मोकळा वेळ नसतो, तिथे लोक नाखूष आणि असमाधानी असल्याच्या तक्रारी अधिक आहेत. भारताच्या तुलनेत ब्रिटनमधील लोक दुप्पट वेळ टिव्ही पाहतात. तर अमेरिकेत अडीच तास टिव्ही पाहिला जातो. ब्रिटनमधील लोकांकडे दररोज ५ तासांपेक्षा अधिक मोकळा वेळ असतो. तर अमेरिकेतही दररोज ५ तासांपेक्षा कमी वेळ टीव्ही पाहिला जातो.

- Advertisement -

भारतातील लोकांकडे ४ तासांचा मोकळा वेळ

भारतातील लोकांकडे ४तास १३ मिनिटांचा मोकळा वेळ असल्याचे नोंदविण्यात आले आहे. तर चीनमध्ये ४ तासांपेक्षा कमी मोकळा वेळ मिळत असल्याचे सांगितले आहे. मानसशास्त्रज्ञ हिमानी कुलकर्णी यांनी मोकळ्या वेळेच्या महत्वाबाबत सांगितले की मानवी मानसिक शक्तींसाठी मोकळा वेळ अत्यंत आवश्यक आहे. हा मोकळा वेळ आपली कार्य करण्याची क्षमता वाढवते. मोकळ्या वेळ न मिळाल्याने मानवाची विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

भारतात महिला रोजगाराचे प्रमाण कमी

जगभरातील महिलांच्या कामाचे तास आणि आरामाची वेळेत फार अंतर असल्याचे अहवालात समोर आले आहे. भारतात २०% महिला नोकरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण ७२%पेक्षा जास्त नोंदविण्यात आले आहे. चीनमध्ये ६०% हून जास्त महिला नोकरी करतात तसेच अमेरिकेतही महिलांच्या नोकरी करण्याचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे.
महिलांच्या बाबतीत हा अहवाल नोकरीपुरताच मर्यादित नसून महिलांच्या मोकळ्या वेळेबाबतचीही माहिती देण्यात आली आहे. अवर वर्ल्ड इन डेटाच्या मते जगातील महिला नोकरीतच नाही तर इतर गोष्टींमध्येही बरोबरी करतात. महिलांना पैसे मिळत नाहीत. तसेच महिलांचा घरगुती कामामध्ये अधिक वेळ जातो. यामुळे महिलांना विश्रांती घेण्याची मुभा मिळत नाही. मानसशास्त्रज्ञ हिमानी म्हणतात की भारतातील स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी मोकळा वेळ मिळतो. महिलांना आराम करण्यासाठीही पुरुषांपेक्षा कमी वेळ मिळत असल्याचे अहवालातून निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

लोक २५ तासांपैकी ९०% वेळ झोप, खाणे, विश्रांतीत घालवतात

ओईसीडी अहवालात असे म्हटले आहे की, जगभरातील नागरिक दिवसातील २४ तासांपैकी ९०% झोपण्यासाठी, जेवणासाठी आणि विश्रांती घेण्यात घालवतात. संशोधनानुसार चिनी लोक जगभरात सर्वात जास्त झोपतात. यामध्ये दुसर्‍या क्रमांकावर भारतीय आहेत. भारतीय नागरिक चिनी लोकांपेक्षा १५ मिनिटे कमी झोपतात.

भारत आणि चीन सर्वाधिक वेळ स्वयंपाकासाठी घालवतात, भारत आणि चीन अमेरिकेपेक्षा खाण्यापिण्यात जास्त वेळ घालवतात. हा वेळ स्वयंपाक करण्याच्या लांब प्रक्रियेमुळे खर्च होतो. याबाबत पोषण तज्ज्ञ डॉ. निधि सांगतात, ‘चीनमध्ये कौटुंबिक संस्कृती आहे. प्रत्येकजण घरकामात गुंतलेला असतो. भारतात स्वयंपाकासाठी सरासरी ८४ मिनिटांच्या वेळाची नोंद करण्यात आली आहे. अन्नातील विविधतेमुळे आपल्याला स्वयंपाक करण्यास अधिक वेळ लागतो.

चीनमधील लोक भारतीयांपेक्षा ४५ मिनिटे जास्त काम करतात. प्रो. केशव मिश्रा स्पष्ट करतात, ‘चीनमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून काम सुरू होतं. दुपारी संपूर्ण एक तासाची सुट्टी असते. खाल्ल्यानंतर त्वरित झोपण्याची संस्कृती देखील आहे. चीनमधील १९७८ च्या आर्थिक क्रांतीनंतर चीनमधील लोकांचे जीवनही बदलले आहे. ही कारणे आहेत ज्यात चीनमधील लोक जगात सर्वाधिक काम करतात आणि सर्वात जास्त झोपतात. तिन्हीची आर्थिक स्थिती, संस्कृती आणि पर्यावरण यामुळे योगदान देते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -