घरदेश-विदेश'ग्रीन'ऐवजी इथे मिळतो 'ब्ल्यू' सिग्नल!

‘ग्रीन’ऐवजी इथे मिळतो ‘ब्ल्यू’ सिग्नल!

Subscribe

जगात असा एक देश आहे, जिथे ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल आणि पिवळ्या लाईटसोबत चक्क निळ्या रंगाचा लाईट असतो. हिरव्या सिग्नलचंच काम हा निळा लाईट करतो. जपानमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सिग्नल पाहयला मिळतात. ज्यामध्ये लाल लाईट (थांबा), पिवळा लाईट (सावकाश जा) आणि निळा लाईट (पुढे जा) अशी रचना पाहायला मिळते.

रस्ता असो किंवा रेल्वे मार्ग, ‘ट्रॅफिक सिग्नल’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक खांब आणि त्यावर पेटणारे लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन रंग. मात्र जगात असा एक देश आहे, जिथे ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल आणि पिवळ्या लाईटसोबत चक्क निळ्या रंगाचा लाईट असतो. हिरव्या सिग्नलचंच काम हा निळा लाईट करतो.

म्हणून हिरव्याऐवजी असतो निळा लाईट

जपानमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सिग्नल पाहयला मिळतात. ज्यामध्ये लाल लाईट (थांबा), पिवळा लाईट (सावकाश जा) आणि निळा लाईट (पुढे जा) अशी रचना पाहायला मिळते. साधारण शंभर वर्षांपूर्वी जपानीज भाषेमध्ये फक्त काळा, पांढरा, लाल आणि निळा या ४ रंगांचाच समावेश करण्यात आला होता. त्यामुळे हिरवा रंग दाखवायचा असल्यास लोकांना निळा रंगच दाखवावा लागायचा. कारण हिरवा रंग हा वरील ४ रंगांपैकी निळ्या रंगाच्या जवळ जाणारा रंग आहे.

- Advertisement -

‘एओ’ शब्दामध्ये दडलंय रहस्य

जपानमध्ये अनेक वर्षांपासून निळा आणि हिरवा या दोन्ही रंगांसाठी ‘एओ’ हा एकच शब्द वापरला जातो. त्यामुळे स्थानिक नागरिक वर्षानुवर्षे हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू वा पदार्थ दर्शवण्यासाठी ‘एओ’ शब्दाचाच वापर करत असत. त्याकाळी जपानमधल्या अनेक सरकारी दस्तऐवजांमध्येही निळ्या (मूळ रंग) आणि पर्यायाने हिरव्या रंगासाठी ‘एओ’ शब्दाचीच नोंद करण्यात आली. सिग्नल यंत्रणेच्या रचनेमध्येही याच शब्दाचा अधिकृत समावेश करण्यात आला.

- Advertisement -

‘निळ्या’ सिग्नलला ऐतिहासिक वारसा

जपानमध्ये १९३० सालापासून रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल सुरु झाले. सुरुवातीला त्यामध्ये लाल आणि पिवळ्या लाईटसोबत हिरवा लाईट वापरला जायचा. दरम्यान, जपानमध्ये हिरव्या रंगासाठी ‘मिडोरी’ हा स्वतंत्र शब्द प्रचलित झाला होता. हिरवा रंग दर्शवण्यासाठी एओ ऐवजी ‘मिडोरी’ शब्द वापरण्यास लोकांनी सुरुवात केली होती. मात्र, सिग्नल यंत्रणेच्या कायदेशीर दस्तऐवजांमध्ये ‘एओ’ हाच शब्द नोंदविला गेला होता जो निळ्या रंगाचा दर्शक होता.

‘करार’ न पाळल्यामुळे आजही निळा रंग

दरम्यान, १९६८ साली ‘व्हिएन्‍ना कन्व्हेन्शन ऑन रोड साईन अँड सिग्‍नल’ हा करार निश्चित करण्यात आला होता. या करारानुसार जगभरातील सिग्नल यंत्रणेमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन रंग निश्चित करण्यात आले होते. या करारावर भारतासह अन्य ६९ देशांनी सही केली होती. मात्र, जपापने या करारावर सही न केल्यामुळे, आजही इथल्या सिग्नलमध्ये निळा रंग अबाधित आहे. मात्र, दिशा दर्शविण्यासाठी (उजवीकडे वळा / डावीकडे वळा) हिरव्या लाईटचा वापर केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -