घरCORONA UPDATEदेशवासियांनो हा आठवडा कोरोनाचे भविष्य सांगणार

देशवासियांनो हा आठवडा कोरोनाचे भविष्य सांगणार

Subscribe

भारतामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा एक हजारावर गेला आहे. यामुळे एक हजार कोरोना रुग्ण असलेल्या २० देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे असून लॉकडाऊनमुळे कोरोनावर कितपत नियंत्रण मिळवता आले हे या आठवड्यात स्पष्ट होणार आहे. यामुळे हा आठवडा तमाम भारतीयांसाठी महत्वाचा असून त्यावरच कोरोना भारतात अजून किती काळ तग धरेल हे स्पष्ट होणार आहे.

जर या आठवड्यात समूह संसर्गाचा आकडा वाढला तर भारतावरही कोरोनाचा प्रकोप होईल. पण ज्या देशांनी दुसऱ्या देशांपासून धडा घेत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या तेथे कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे. भारतानेही लॉक़डाऊन करत याच देशांच्या पावलावर पाऊल टाकले असले तरी या आठवड्यात भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा कोरोनाचे भवितव्य सांगेल असे तज्ज्ञ सांगत आहेत. इटली व स्पेनने मात्र या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले यामुळे तेथे कोरोनाने कहर केला होता.

- Advertisement -

दरम्यान, जर कोरोना रुग्णांचा आकडा या आठवड्यात हजाराहून अधिक झाला तर नऊ हजार आकडा ओलांडून भारतही चीनच्या दिशेने जाऊ शकतो. पण सध्याची स्थिती पाहता भारतातील कोरोना रुग्णांची संख्या जपान एवढीच आहे. यामुळे हा आकडा १५०० एवढाच होईल असा अंदाज आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -