घरCORONA UPDATECoronaEffect: होम क्वारंटाइन असलेल्यांना पाठवावा लागणार सेल्फी

CoronaEffect: होम क्वारंटाइन असलेल्यांना पाठवावा लागणार सेल्फी

Subscribe

होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या कोरोना संशयित तसेच रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने वेगळी शक्कल लढवली आहे. आता होम क्वारंटाइन असलेल्यांना दर तासाला कर्नाटक सरकारला त्यांचा सेल्फी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या कोरोना संशयित तसेच रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने वेगळी शक्कल लढवली आहे. आता होम क्वारंटाइन असलेल्यांना दर तासाला कर्नाटक सरकारला त्यांचा सेल्फी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सरकारच्या राजस्व विभागातर्फे क्वारंटाइन वॉच नावाचे एक मोबाइल अॅप्लिकेशन बनवण्यात आले आहे. तसेच या अॅपवर सेल्फी पाठवण्याबाबत सुचना देताना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. जर होम क्वारंटाइन असलेल्यांनी सेल्फी पाठवण्यात दिरंगाई केली तर त्यांना क्वारंटाइन सेंटर्समध्ये पाठवण्यात येईल, असे कर्नाटक सरकारने नमूद केले आहे.

हेही वाचा – CoronaEffect: मेडिकल दुकानात लवकरच औषधांचा तुटवडा

- Advertisement -

कर्नाटकमधील शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सर्व होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या लोकांना आदेश दिले आहेत की, त्यांनी या अॅपमध्ये आपले नाव नोंदवून दर तासाला सेल्फे पाठवावा. मंत्री यांनी सांगितले की, जे कोणी होम क्वारंटाइन असतील त्यांना दर तासाला या अॅपद्वारे त्यांचा सेल्फी पाठवायचा आहे. या अॅपमध्ये जीएसपी ट्रॅकरची सुविधा असून सेल्फी पाठवणाऱ्या व्यक्तीच्या स्थानाची माहिती देईल. होम क्वारंटाइन असलेल्यांना फक्त रात्री १० ते सकाळी ७ च्या दरम्यान सेल्फी न पाठवण्याची मुभा आहे. मात्र या वेळेव्यतिरिक्त दर तासाला सेल्फी पाठवला नाही तर सरकार स्वतः अशा लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना सरकारद्वारे बनवण्यात आलेल्या सामुहिक होम क्वारंटाइनमध्ये पाठवेल.

जर होम क्वारंटाइन असलेल्यांनी चुकीचा फोटो पाठवून सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना सामुहिक होम क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. त्याशिवाय कर्नाटक सरकार घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. या दरम्यान सरकारच्या टीमसोबत क्वारंटाइन व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांचा फोटो काढून संबंधितांना पाठवला जाईल.

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus Crisis: कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात, ६०० कोटींचा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -