घरदेश-विदेशममतादींना झटका; ३ आमदारांसह ६० नगरसेवकांचा भाजप प्रवेश

ममतादींना झटका; ३ आमदारांसह ६० नगरसेवकांचा भाजप प्रवेश

Subscribe

लोकसभा निवडणुकीत बंगालमधील मिळालेल्या यशामुळे भाजप आता ममता बनर्जी यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे युध्द सुरु असतानाच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये १८ खासदार निवडणून आणलेल्या भाजपने ममतादींना झटका दिला आहे. टीएमसीचे दोन आमदार आणि सीपीएमच्या एका आमदारासह ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेले टीएमसीचे माजी नेते मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेस केला. यामधील एक आमदार सीपीएमचा आहे. शुभ्रांशु रॉय बीजापूरचे आमदार आहे. त्याव्यतिरिक्त विष्णुपूरचे टीएमसीचे आमदार तुषार कांती भट्टाचार्य, हेमताबादचे सीपीएमचे आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

टीएमसीच्या आमदार आणि नगरसेवकांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय तणावाचे तणावाचे वातावरण वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बंगालमधील मिळालेल्या यशामुळे भाजप आता ममता बनर्जी यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशू रॉय यांना पक्षाने काही दिवसांपूर्वी निलंबित केले होते. पक्षाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत त्यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.

- Advertisement -

काचरापारा महानगरपालिकेच्या १७ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांच्यासह १७ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकूण २६ नगरसेवक असलेल्या या महानगरपालिकेतील १७ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. त्याव्यतिरिक्त दोन आणखी महानगरपालिकेवर भाजपने सत्ता मिळवली आहे. तीन महानगरपालिकेचे जवळपास ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे टीएमसीला धक्का बसला आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -