व्हिडिओत दिसणाऱ्या ‘त्या’ वाघांना हीन वागणूक देणाऱ्या वन कर्मचाऱ्यांचं निलंबन!

Raipur
tiger in raipur jungal safari

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या रायपूरमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. छत्तीसगड टायगर सफारीच्या एका बसच्या मागे दोन वाघ पळत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं. या बसमधून एका साधं गोणपाट लोंबत होतं आणि त्याच्यामागे त्या वाघांना पळवलं जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवाय, बसमध्ये बसलेले वनकर्मचारी आणि पर्यटक वाघांच्या या परिस्थितीचा आनंद लुटत असल्याचं देखील व्हिडिओमधून येणाऱ्या आवाजांवरून स्पष्ट होत होतं. हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर रायपूरमधील टायगर सफारी घडवणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. अखेर त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं वनविभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

वाघांना गाडीच्या मागे पळवलं!

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ शुक्रवारी काढण्यात आला होता. या टूरिस्ट बसच्या मागे हे दोन्ही वाघ पळत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. वनविभागाने ठरवून दिलेल्या निकषांचं हे उल्लंघन आहे. वनविभागाने याची गंभीर दखल घेतली असून त्यासाठी जबाबदार असलेल्या वन विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा वनअधिकारी मर्सी बेला यांनी सांगितलं. नवीन पुरेनिया (गाईड), नरेंद्र सिन्हा (गाईड) आणि ओम प्रकाश भारती (चालक) अशी या तिघांची नावं आहेत.

This is how tigers are treated at Raipur Jungle Safari Shame!

Ritesh Mishra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 15, 2020

छत्तीसगडच्या रायपूरच्या बाहेरच्या भागात असणाऱ्या सुमारे अडीचशेहून जास्त हेक्टर जंगलामध्ये टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. या जंगलात १०० चितळ, २० नीलगाई, ५ हरिण, ४ वाघ आणि ७ सिंह आहेत.