घरदेश-विदेशटिक टॉकची ड्रामाबाजी बंद होणार?

टिक टॉकची ड्रामाबाजी बंद होणार?

Subscribe

टिक टॉक अॅपवर तमिळ सरकारने आक्षेप उचलला आहे. हा अॅप बंद व्हावा, अशी मागणी तमिळ सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

सध्या तरुणाईला टिक टॉक अॅपने भुरळ घातले आहे. या अॅपमार्फत तरुण मुलं-मुली एखाद्या गाण्यावर किंवा डायलॉगवर व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. अल्पावधीतच टिक टॉक अॅप लोकप्रिय झाला आहे. परंतु, या अॅपवर तमिळनाडू सरकारने आक्षेप घेतला आहे. हे अॅप बंद करण्याचा विचार तमिळनाडू सरकार करत आहे. ब्ल्यु व्हेल गेमवर ज्याप्रकारे बंदी घालण्यात आली आहे, त्याचप्रकारे बंदी टिक टॉकवर आणण्याचा विचार तमिळ सरकार करत आहे. त्यामुळे टिक टॉकची ही ड्रामाबाजी लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.

तमिळ सरकारने का केला विरोध?

तमिळ सरकारने टिक टॉकला विरोध केला आहे. हा अॅप बंद करावा, अशी विनंती तमिळ सरकारने केंद्र सरकारला केली आहे. या विरोधामागील कारणही तमिळ सरकारने सांगितले आहे. टिक टॉक अॅपमुळे तमिळ संसकृतीचे पतन होत असल्याचे तमिळनाडू सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर या अॅपमुळे कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण होत असल्याचे तमिळ सरकारने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -