घरCORONA UPDATETikTok - केवळ मनोरंजन नाही तर कोरोनाशी लढण्यासाठी केली आर्थिक मदत!

TikTok – केवळ मनोरंजन नाही तर कोरोनाशी लढण्यासाठी केली आर्थिक मदत!

Subscribe

टिक टॉक इंडिया कंपनी आर्थिक मदतीची विभागणी करणार आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी तब्बल ४० हजार हजमत मेडिकल प्रोटेक्टिव सूट आणि दोन लाख मास्कची मदत करणार आहेत.

कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर देशाची आर्थिक स्थीती भक्कम असणे गरजेचं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन देशवासीयांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला. चहूबाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला. यात बॉलिवूडकर आणि व्यवसायिक सगळ्यात आघाडीवर होते. आता मोदींच्या या आवाहनाला टिक –टॉकनेही मदत केली आहे. टिक टॉकने तब्बल १०० कोटी रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीत दिले आहेत.

- Advertisement -

पैशांची विभागणी

टिक टॉक इंडिया कंपनी आर्थिक मदतीची विभागणी करणार आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी तब्बल ४० हजार हजमत मेडिकल प्रोटेक्टिव सूट आणि दोन लाख मास्कची मदत करणार आहेत. तर उर्वरीत रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीत देणार आहेत. अशी माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

टिक टॉकची लोकप्रियता

टिक –टॉक भारतातील सर्वाधीक लोकप्रिय अप्लिकेशन्स एक आहे. १० कोटींपेक्षा जास्त लोक टिक टॉकवर आहेत. अनेकजण आज टिक टॉकच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. या अपवर अनेक लोकांना आपलं टॅलेंण्ट दाखवायची संधी मिळील. टिक टॉकने भारतीयांना अक्षरश: वेड लावले.

- Advertisement -

हे ही वाचा – वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -