टिक-टॉक स्टार झाली भाजपची उमेदवार

हरयाणातील आदमपूर विधानसभा निवडणुकासाठी टिक-टॉक स्टार सोनाली फोगटला भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले.

Haryana
tik tok star sonali phogat get bjp candidate ticket for haryana assembly election 2019
टिक-टॉक स्टार झाली भाजपची उमेदवार

सोशल मीडियाचा वापर करून कधी कोण किती प्रसिद्ध होईल हे सांगू शकतं नाही. प्रिया वॉरियर, रानू मंडल यासारख्या व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करून रातोरात स्टार झाल्या आहे. असंच काहीस पुन्हा एकदा घडलं आहे. ‘टिक-टॉक’ स्टार सोनाली फोगट हिला चक्क भाजपने हरयाणाच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपचे दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा पुत्र कुलदीप बिश्रोई यांच्या विरोधात सोनाली फोगटला आदमपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

सोनाली ही ‘टिक-टॉक’वर खूप प्रसिद्ध आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आहेत. ‘टिक-टॉक’वर सोनाली फोगट हिचे १ लाख ३२ हजारापेक्षा जास्त लोक फॉलोअर्स आहेत. सोनाली राजकारणात येण्याआधी अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

हेही वाचासेक्स, विस्की, चॉकलेट आणि महात्मा गांधी

भाजपाकडून जेव्हा सोनालीला उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा तिने विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला. सोनाली असं म्हणाली की, ‘मला पाठिंबा देण्यासाठी माझे फॉलोअर्स आहेत. ते मी कधी एकदा उमेदवारीचा अर्ज भरते याचीच वाट पहात आहेत. माझ्यावर माझ्या पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही नक्की विजयी होऊ’, असे तिने मत व्यक्त केले.

आदमपूर मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले कुलदीप बिश्रोई यांच्या विरोधात भाजपने सोनीला उभे केले आहे. कुलदीप बिश्रोई यांचा २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत मोठा विजय झाला होता. आता सोनालीला तिचे चाहते किती पाठिंबा देतात हे येत्या काळात कळेल.

हेही वाचा – Video: पाहा विरुष्काचा लिपलॉक

पाहा सोनालीचे काही ‘टिक-टॉक’ व्हिडिओ.