घरट्रेंडिंगVideo : Tiktok बंद झाल्याचे समजताच शाहरूख - काजोल ढसाढसा रडले!

Video : Tiktok बंद झाल्याचे समजताच शाहरूख – काजोल ढसाढसा रडले!

Subscribe

टिकटॉक बॅन झाल्यामुळे कलाकार मात्र हिरमुसले आहेत. केवळ हिरमुसले नाहीत तर ओक्साबोक्शी रडत आहेत.

भारतात टिकटॉक बॅन केल्याचं दुख:  अनेक भारतीयांना झालं आहे. टिकटॉक हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. अनेकांचे लाखो फॉलोअर्स टिकटॉकवर आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून अनेकजण आपल्या कलागुणांना वाव देतात. त्यामुळेच हे App भारतीयांमध्ये अतीशय लोकप्रिय आहे. आज टिकटॉकमुळे अनेक स्टार झाले आहेत. लाखो रूपये कमवत आहेत. पण आता टिकटॉक बॅन झाल्यामुळे कलाकार मात्र हिरमुसले आहेत. केवळ हिरमुसले नाहीत तर ओक्साबोक्शी रडत आहेत.

२९ जुलै रोजी केंद्र सरकारनं एक निर्णय घेतला. एखाद्या कलाकाराप्रमाणेच टिकटॉकव सेलिब्रेटी झालं होतं. यातच टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले दिनेश पवार हे त्यापैकी एक दिनेश पवार आणि त्यांच्या कुटूंबियांचा वेगळा चाहता वर्ग आहे. टिकटॉकवरचे शाहरूख – काजोल असं दिनेश पवरांना म्हटलं जायचं. पण टिकटॉक बंद झाल्याच ऐकून दिनेश पवार आणि त्यांच्या दोन बायकांना धक्काच बसला आहे. त्याच्या दोन्ही बायका चक्क ढसाढसा रडत होता. “आम्ही उद्ध्वस्त झालो, ही बातमी ऐकून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या, या बंदीच्या निर्णयामुळे आमच्यासारखे लाखो लोक दुखावले गेले आहेत. मात्र, आता आम्ही यू ट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया टिकटॉक स्टार दिनेश पवार यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल App बंदी घातली आहे. या मोबाईल Appमध्ये टीक-टॉक, युसी ब्राऊसर यांच्यासह इतर चिनी App आहेत. हे App देशाची सुरक्षा, अखंडता आणि स्वायत्तबाबत पूर्वग्रहदुषित असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. चीनच्या या App वर बंदी घातल्यामुळे आगामी काळात चीन-भारताचे संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनकडून त्याबाबत प्रतिक्रिया आली नसली तरी आगामी काळात चीन नक्कीच त्याबाबत कारवाई करू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


हे ही वाचा – सावधान! चीन आणि पाकिस्तान एकाचवेळी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -