घरCORONA UPDATEभारतीय नव्हे तर पाकिस्तानी कंपनीने बनवले Mitron अॅप; वाचा सविस्तर

भारतीय नव्हे तर पाकिस्तानी कंपनीने बनवले Mitron अॅप; वाचा सविस्तर

Subscribe

सध्या जगभरातून चीनविषयीची उद्रेकाची लाट पाहालया मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरला असून याची सुरूवात चीनपासून झाल्याने सर्व देश त्यांच्यावर नाराज आहेत. अशातच भारतामध्येही चीनी वस्तू आणि चीनने बनवलेले अॅप बॅन करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. चीनी टिकटॉकला टक्कर देण्यासाठी काही दिवसांपूर्वी मित्रो हे व्हिडिओ अॅप आले होते. कमी कालावधीतच या अॅपने चांगले युजर्स मिळवले. मात्र भारतीय बनावटीच्या या अॅपचे पाकिस्तानी कनेक्शन असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या गोष्टीमुळे मित्रो अॅपची जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा – केरळमध्ये मान्सून दाखल; येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

- Advertisement -

असे आहे कनेक्शन

मित्रो अॅप हे भारतात डेव्हलप झाले नसून पाकिस्तानी सॉफ्टवेअर डेव्हलपर Qboxus यांचे हे अॅप आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका अहवालातून याची माहिती समोर आली आहे. भारतात मित्रो अॅप सर्वाधिक डाऊनलोड केले जात आहे. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रो या शब्दाचा उल्लेख आपल्या भाषणात करतात. त्यामुळे अॅप भारतीय असल्याचे सर्वांचा वाटले. परंतू नवीन अहवालामध्ये हे अॅप पाकिस्तानी कंपनी Qboxus ने बनवल्याचा दावा करण्यात आला आहे. या कंपनीचे सीईओ आणि संस्थापक इरफा शेख यांनी मित्रोची निर्मिती केल्याचे सांगितले जात आहे. याच कंपनीने टिकटिक अॅपदेखील बनवले होते. इरफान यांनी टाइम्स ऑफ इंडिया गॅजेट्स नाऊ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मित्रो अॅप त्या डेव्हलपरला टिकटिकचे सोर्स कोड तब्बल २ हजार ५०० रुपयांना विकले. दरम्यान, हे अॅप पाकिस्तानी कंपनीने बनवले असल्याची चर्चा होताच याचे डाऊनलोड रेटींग कमी झाले आहे. सुरूवातील सर्वाधिक डाऊनलोड होणारे हे अॅप होते. त्यांनी झटपट ५० लाख युजर्स मिळवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -