घरदेश-विदेश'या' कारणामुळे खासदार नुसरत जहाँ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर

‘या’ कारणामुळे खासदार नुसरत जहाँ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर

Subscribe

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पण प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर राहिल्या आहेत.

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पण प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर राहिल्या आहेत. तब्येतीच्या कारणामुळे त्या गैरहजर राहिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री नुसरत जहाँ यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

नुसरत यांची तब्येत ठिक – प्रवक्ता

नुसरत जहां यांना रविवारी श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यानंतर त्यांना कोलकाताच्या अपोलो ग्लेनईगल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता नुसरत यांची तब्येत ठिक असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल अशी माहिती नुसरत यांचे प्रवक्ता अभिषेक मजूमदार यांनी दिली आहे.

- Advertisement -

निखिल जैन यांच्याशी विवाह

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहाँ यांना जनतेने भरघोष मतांनी निवडून दिलं. नुसरत यांनी पश्चिम बंगालच्या बशीरहाटमधून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तीन लाखांहून अधिक मतं मिळवून नुसरत जहाँ निवडून आल्या होत्या. १९ जून रोजी तुर्कीमध्ये व्यावसायिक निखिल जैन आणि नुसरत यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा पार पडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -