घरदेश-विदेश'मंदिर, मस्जिद बांधणे राजकीय पक्षांचं काम नाही'

‘मंदिर, मस्जिद बांधणे राजकीय पक्षांचं काम नाही’

Subscribe

दिर, मस्जिद बांधणे राजकीय पक्षांचं काम नाही असं म्हणत उपेंद्र कुशवाह यांना भाजपला अप्रत्यक्ष का होईना पण टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला.

देशभरात सध्या राम मंदिर आणि बाबरी मस्जिदवरून जोरदार वाद सुरू आहेत. त्यावर आता केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे खासदार उपेंद्र कुशवाह यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पक्षाच्या चिंतन बैठकीमध्ये बोलताना त्यांनी मंदिर, मस्जिद बांधणे राजकीय पक्षांचं काम नाही असं म्हणत उपेंद्र कुशवाह यांना भाजपला अप्रत्यक्ष का होईना पण टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला. बिहारमध्ये नीतीश मॉडेलनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही अशा शब्दात त्यांना नीतीश कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सत्ताधारी भाजप सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आहेत. अशा वेळी उपेंद्र कुशवाह यांनी थेट सरकारचं लक्ष्य केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघनं यापूर्वी राम मंदिरासाठी जमिनीचं अधिग्रहण करा, कायदा करा अशी मागणी केली आहे. त्यात शिवसेनेनं देखील अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -