घरक्रीडाआज भारत वि.पाकिस्तान सामना

आज भारत वि.पाकिस्तान सामना

Subscribe

जगात कट्टर प्रतिस्पर्धी हे असतातच. मग क्षेत्र कुठलेही असो.अगदी फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत. असाच एक बहुचर्चित आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019 चा सर्वाधिक उत्कंठावर्धक सामना रविवारी इंग्लंडमधील मँचेस्टरच्या मैदानावर पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना चर्चेत आहे. सामना खेळावा की नको ते आतापर्यंत या लढतीवर अनेक चर्चा झडल्या. परंतु,अखेर हा सामना होणार आह

दोन्ही देशांतील रणातील युद्ध आणि क्रिकेटचे मैदान त्याच इर्षेने तसेच जोषाने खेळले जाते.जेवढे खेळाडू हा सामना त्वेषाने खेळणार आहेत त्याच किंवा त्यापेक्षा जास्त त्वेषाने दोन्ही देशांतील प्रेक्षक हा सामना पाहणार आहेत.सोशल मीडियावर तर दोन्ही बाजूंच्या पाठिराख्यांनी धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. एकमेकांवरील मिम्स,व्हीडिओज,फोटो यांनी संपूर्ण इंटरनेटवर याच सामन्याची चलती असणार आहे.त्यात रविवारी हा सामना असल्याने भारतीय प्रेक्षक मोठ्या उत्साहाने आणि जोशाने या सामन्याची मजा लुटणार आहेत.

- Advertisement -

हा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या मँचेस्टरच्या मैदानात कसून सराव करतो आहे. तसेच या सामन्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे. या पार्श्वभूमीवर स्कॉटलंड यार्डने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना ब्लॅकने तिकीटे विकत न घेण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला तिकिटांच्या छायाप्रती किंवा बनावट तिकिटांची विक्री होऊ शकते असे स्कॉटलंड यार्डने म्हटले आहे.

आम्ही चांगला खेळ केला तर कोणत्याही संघाला आम्ही हरवू शकतो. समोर कोणता प्रतिस्पर्धी संघ आहे, यावरुन काही परक पडत नाही. समोर कोणताही संघ असला तरीही प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करणे अपेक्षित आहे. – विराट कोहली, कर्णधार, भारतीय संघ.

- Advertisement -

दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना या लढतीची प्रचंड उत्सुकता असते. ज्या स्टेडिमयवर हा सामना होणार आहे, त्याची क्षमता २४ हजार आहे पण तिकीटांसाठी ८ लाख लोकांनी अर्ज केले होते. त्यावरुन हा सामना किती मोठा आहे त्याची कल्पना येते. – इंझमाम -उल-हक, निवड समिती प्रमुख, पाकिस्तान.

सामन्याची वेळ : आज दुपारी 3 वाजता
थेट प्रक्षेपण :- स्टार स्पोर्ट नेटवर्क ,डीडी नॅशनल,हॉट स्टार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -