घरदेश-विदेशसर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराला ब्रेक!

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराला ब्रेक!

Subscribe

सरकारी ऑयल मार्केटिंग कंपनी IOC ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नाही

देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गणितं कोलमडली असल्याने सर्वसामान्य विचारपुर्वक आर्थिक व्यवहार करत आहेत. यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बऱ्याच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वेगाने वाढत होत्या, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नसल्याने या सतत वाढणाऱ्या किंमतीला काहिसा ब्रेक लागला असल्याचे म्हणता येईल. सरकारी ऑयल मार्केटिंग कंपनी IOC ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नाही. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८०. ४३ रुपये आणि डिझेलचे दर ८०.७८ रुपये होते.

- Advertisement -

रोज सकाळी ६ वाजता येता नवे दर 

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजेपासून लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

सध्या मुंबईत पेट्रोलची किंमत ८७. १९ रुपये आणि डिझेलची किंमत ७९.०५ रुपये आहे. तर कोलकाता येथे पेट्रोल ८२.१० रूपये आणि डिझेल ७५.८९ रुपये आहे.
यासह चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर ८३.६३ रुपये तर डिझेलची किंमत ७७. ९१ रुपये आहे.


Corona: अमेरिका लसनिर्मितीसाठी ‘या’ कंपनीला देणार १२ हजार कोटी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -