PM Modi आज कोरोना विरोधात जनआंदोलनाची सुरुवात करणार

today prime minister narendra modi to launch jan andolan for covid-19 appropriate behavior
PM Modi आज कोरोना विरोधात जनआंदोलनाची सुरुवात करणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सणासुदीच्या आणि हिवाळ्यामध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जनआंदोलनाची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी ट्विटरच्या माध्यमातून या अभियानाला सुरुवात करतील. आगामी सण आणि हिवाळ्यासह अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सुरु केलेल्या बाजारपेठेसह इतर गोष्टी लक्षात घेऊन हे अभियान सुरू केले जात आहे.

लोकांच्या भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात केली जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘कोरोना पासून बचाव करण्याचे हत्यार मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि हात धुणे आहे. या तत्त्वाचे पालन करून सार्वजनिक ठिकाणी या उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली जाईल.’

पुढे प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात लोकांना घाबरण्याची नाही तर सावध राहण्याची आवश्यकता आहे. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवले जाईल. तसेच सर्वांकडून कोरोनाची एक शपथ घेतली जाईल.’

जगातील कोरोनाच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६८ लाखांहून अधिक आहे. तर १ लाख ५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात ९ लाख Active रुग्ण असून ५८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – बिहार निवडणुकीत आता शिवसेनेची काँग्रेसला साथ