घरताज्या घडामोडीसाबणापासून टॉयलेट कव्हरपर्यंत सर्व नेलं चोरून; चोरट्यांची रेल्वेवर हातसफाई

साबणापासून टॉयलेट कव्हरपर्यंत सर्व नेलं चोरून; चोरट्यांची रेल्वेवर हातसफाई

Subscribe

उत्कृष्ट योजनेच्या माध्यमातून ४०० करोड खर्च करुन लांब पल्ल्याच्या रेल्वेंना आलीशान बनवलं होतं. मात्र, चोरट्यांनी रेल्वेमधून साबणापासून टॉयलेट कव्हरपर्यंत सर्व चोरून नेलं. यामुळे रेल्वेला ५४ लाखांचं नुकसाम झालं.

भारतीय रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने उत्कृष्ट योजनेच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या रेल्वेंना आलीशान बनवलं आहे. उत्कृष्ट योजनेंतर्गत बाथरूममध्ये मोठे आरसे, स्टीलचे नळ, अँटी स्किड फ्लोअरिंग, डस्टबिन आदी रेल्वेमध्ये लावण्यात आले होते. मात्र, चोरटे सर्वच चोरुन घेऊन गेले.

भारतीय रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांना दीड वर्षांपूर्वी आलीशान बनवले होते. उत्कृष्ट योजनेच्या माध्यमातून ३०० उत्कृष्ट रॅक स्थापित केले होते. मात्र, शौचालय आणि वॉश बेसिनमधून ५००० हून अधिक स्टेनलेस स्टीलच्या नळांची चोरी झाली आहे. सुमारे ८० उत्कृष्ट रॅकमधून स्टेनलेस स्टीलच्या फ्रेमसह सुमारे २ हजार आरसे, सुमारे ५०० द्रव साबण वितरक आणि सुमारे ३ हजार शौचालय फ्लश वॉल्व्ह चोरीला गेले आहेत. एका आरशाची किंमत ६०० रुपये तर एका नळाची किंमत १०८ रुपये आहे. यासह चोरांनी सीटचे कवर देखील चोरुन नेले आहेत.

- Advertisement -

२०१८ मध्ये ४०० करोड खर्च करुन उत्कृष्ट योजना चालू केली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्हीसाठी उत्कृष्ट रॅक प्रदान करण्यात आले आहेत. रेल्वेच्या डब्यांना एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. मात्र, या चोरीमुळे मध्य रेल्वेला १५.२५ लाखांचे तर पश्चिम रेल्वेला ३८.५८ लाखांचे नुकसान झाले असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -