हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी कोरोनामुक्त

mumbai

हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन करोनामुक्त झाले असून ऑस्ट्रेलियातून ते आपल्या घरी अमेरिकेला परतले आहेत. टॉम व रिटा हे पहिले सेलिब्रिटी होते ज्यांना करोनाची लागण झाली होती.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे दोघे ऑस्ट्रेलियाला गेले होते. तेथे सिंगिंग लीजेंड एल्विस पर्सली यांच्या जीवनपटाची शुटींग सुरु असून टॉम यांची त्यात प्रमुख भूमिका आहे. पण तेथे हे दोघे आजारी पडले. चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. याबद्दल टॉम यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. आम्ही दोघे ऑस्ट्रेलियात असून दोघांना सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप आहे. आम्ही चाचणी केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे व आम्हाला क्वारनटाईन केल्याचे टॉम यांनी सांगितले. त्यानंतर या दोघांनी आमच्यावर व्यवस्थित उपचार सुरू असून आता आम्ही बरे आहोत असेही सोशल मीडियावर सांगितले होते. २७ मार्चला टॉम व रिटा अमेरिकेत परतले असून दोघांनी त्यांचा् हॅप्पी हवरचा फोटोही शेअर केला आहे.