घरदेश-विदेशलोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

Subscribe

लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान झाले आहे.

देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झाले आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू – काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६१.१२ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज मतदान झाले आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार होते.

महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

  • नांदेड – ६० टक्के
  • परभणी – ५५ टक्के
  • सोलापूर – ५० टक्के
  • अमरावती – ५३ टक्के
  • बुलढाणा – ५१ टक्के
  • लातूर – ५८ टक्के
  • बीड – ६४ टक्के
  • हिंगोली – ५५ टक्के
  • उस्मानाबाद – ५८ टक्के
  • अकोला – ५४ टक्के

देशातील मतदानाची टक्केवारी

  • आसाम – ७३.३२ टक्के
  • बिहार – ५८.१४ टक्के
  • छत्तीसगड – ६८.७० टक्के
  • जम्मू – काश्मीर – ४३.३७ टक्के
  • महाराष्ट्र – ५५.३७ टक्के
  • मणिपूर – ७४.६९ टक्के
  • ओडिसा – ५७.४१ टक्के
  • पुदुच्चेरी – ७२.४० टक्के
  • तमिळनाडू – ६१.५२ टक्के
  • उत्तर प्रदेश – ५८.१२ टक्के
  • पश्चिम बंगाल – ७५. २७ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -