झोपलेल्या वाघाला दगड मारणे पर्यटकासह गाइडला पडले महाग

राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय अभयारण्यात झोपलेल्या वाघाला दगड मारण्यामुळे एका पर्यटकाला आणि गाइडला महागात पडले आहे.

Mumbai
प्रातिनिधीक फोटो
झोपलेल्या वाघाला दगड मारणे पर्यटकासह गाइडला पडले महाग

अभयारण्यामध्ये वेगवेळ्या प्राणी-पक्षांच्या प्रजातींना प्रत्यक्षात पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावत असतात. मात्र, त्यावेळी काही पर्यटक त्या प्राणी-पक्षींची छेड काढताना दिसतात. असाच एक प्रकार राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय अभयारण्यात मंगळवारी २३ एप्रिलला घडला आहे. एका पर्यटकांनी शांतपणे झोपलेल्या वाघाची छेड काढली आहे. वाघाला दगड मारण्याचा प्रकार अभयारण्यात घडला आहे. मात्र, हा प्रकार त्या पर्यटकाला आणि त्या सोबत गाइडला महागात पडला आहे.

वाघाची छेट काढणाऱ्या पर्यटकाला ठोठावला दंड

झोपलेल्या वाघाला दगड मारल्याच्या कारणावरून एका पर्यटकासह गाइडला ५१ हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. अभयारणातील क्षेत्र ६च्या पीलीघाट गेटवर वाघ झोपला होता. हे गाइड आणि पर्यटकानी पाहिले. त्यावेळी हा पर्यटक जिप्सीमध्ये बसला होता. जिप्सीमधून खाली उतरून त्या पर्यटकांनी आणि गाइडने त्या झोपलेल्या वाघाला दगड मारला. मात्र, हा सर्व प्रकार वाघांवर देखरेख ठेवण्यासाठी लावलेल्या कॉमेऱ्यामध्ये कैद झाला. राष्ट्रीय उद्यानाचे नियम त्या पर्यटक आणि गाइडने मोडला असल्यामुळे त्या दोघांनाही तात्काळ अभयारण्य सोडण्याचे आदेश देऊन, त्यांना ५१ हजार रूपयांचे दंड ठोठवण्यात आल्याचे विभागीय आणि अधिकारी मुकेश सैनी यांनी सांगितले आहे.