घरदेश-विदेशTRAI च्या चेअरमनांचे गीरे तो भी टांग उपर!!

TRAI च्या चेअरमनांचे गीरे तो भी टांग उपर!!

Subscribe

आधार सुरक्षित असल्याचा दावा TRAIचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी केला आहे. सोशल मीडियावर १२ अंकी आधार नंबर शेअर केल्यानंतर एका हॅकरने त्यांची माहिती सार्वजनिक केली होती. त्यानंतर देखील शर्मा यांचा हा दावा हास्यास्पद म्हणावा लागेल, नाही का? शिवाय आधार खरंच सुरक्षित आहे का? हा देखील प्रश्नच आहे.

गीरे तो भी टांग उपर ही म्हण तुम्हाला माहित असेल नाही का? तसाच काहीसा प्रकार TRAIचे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्याबाबतीत झाला आहे. ट्विटरवर बारा अंकी आधार नंबर शेअर केल्यानंतर देखील आपल्या माहितीला कोणताही धोका पोहोचला नसल्याचा दावा TRAIचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी केला आहे. आयआयटी मद्रासचा सिव्हिल इंजिनीअर श्रीनिवास कोडाली याने ट्विट केलेल्या एका बातमीचा दाखला देत आधार कार्डसाठी पुरवलेली माहिती खरचं सुरक्षित आहे का? असा प्रश्न एका युजरने विचारला आणि त्याने शर्मा यांना त्यांचा आधार क्रमांक शेअर करायला सांगितला. शर्मा यांनी देखील त्यांचा आधार कार्ड शेअर केला. आणि अवघ्या काहीच तासात एका फ्रेंच हॅकरने शर्मा यांनी दिलेल्या आधारक्रमांकावरुन सगळी माहिती हॅक केली आणि त्यांचा मोबाईल नंबर शेअर केला. शिवाय तो क्रमांक त्यांच्या सचिवाचा असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचा व्हॉटसअप डिपी देखील त्याने ट्विटवर शेअर केला हे सगळं करणारा एलिएट एडरसन असून त्याने ही माहिती दिल्यानंतर ‘एवढीच माहिती देऊन थांबतो, पण आधार क्रमांक सार्वजनिक करणे धोकादायक आहे, असे त्याने ट्विट देखील केले.

वाचा – परदेशात बसून ‘आधार’ केले हॅक

आधार खरंच सुरक्षित?

TRAIच्या चेअरमनांचे आधार अकाऊंट हॅक करून त्याबाबतची सर्व माहिती पुढे आल्यानंतर आधारच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेटीझन्सला या ट्विटनंतर खाद्यच मिळाले. गोपनीयतेचा दावा करणाऱ्या प्रणालीवरुन सर्वसामान्यांनी त्यांना फैलावर घेतले. शिवाय अनेकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पण तरीही शर्मा हे गोपनीयतेवर ठामच राहिले. आजकाल प्रत्येक ठिकाणी आधारची माहिती घेतली जाते. त्यामुळे हा सारा प्रकार पाहिल्यानंतर आधारच्या सुरक्षिततेबद्दल आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाचा – तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का? असा लावा शोध

वाचा – मोबाईलमध्ये सेव्ह असणारा नंबर आधारकार्डचा नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -