मोबाईल नंबर ११ नाही १० अंकीच राहणार; ‘ट्राय’ने केला खुलासा

New Delhi
मोबाईल

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) यांनी काही दिवसांपूर्वी मोबाइल नंबर ११ अंकाचा होण्याची शक्यता वर्तवली होती. तस प्रस्ताव त्यांनी सादर केला होता. मात्र आता मोबाइल नंबर १० अंकीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रायने ३१ मे रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आता १० अंकीच मोबाइल राहणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे मोबाइल ११ अंकी होण्याच्या बातमीचे खंडन करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की,

ट्रायने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार १० अंकाच्या मोबाइल नंबरला ११ अंकाच्या मोबाइल नंबरमध्ये बदलल्यास देशात जास्त नंबर उपलब्ध होऊ शकतात. तसा प्रस्ताव त्यांनी सादर केला होता. त्यामध्ये म्हटले होते की, मोबाइल नंबरचा पहिला अंक जर ९ ठेवला तर १० ते ११ अंकाच्या मोबाइल नंबरवर स्विच होण्याने देशात एकूण १० बिलियन (१०० कोटी) नंबर्सची क्षमता वाढेल. शिवाय ७० टक्के युटिलायझेशन आणि सध्याच्या धोरणानुसार ७०० कोटी कनेक्शन होण्यापर्यंत खूप आहे. तसेच ट्रायने फिक्स्ड लाइनवरून कॉल करताना मोबाइल नंबरच्या पुढे शून्य लावण्याचा पर्याय सूचवला होता. आता फिक्स्ड लाइन कनेक्शनवरून इंटर सर्विस एरियात मोबाइल कॉल्ससाठी नंबरची सुरुवात शून्य लावायची गरज पडते. तर मोबाइल कॉलवरूनही सुरुवातीला शून्य लावणे बंधनकारक झाल्यानंतर लेवेल २, ३, ४, आणि ६ मध्ये सर्व लेवल्सला मोबाइल नंबरचा वापर करता येवू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा –

धोनी साक्षीला म्हणाला ‘रुममध्येही नीटच कपडे घालायचे’!