घरदेश-विदेशट्रेन १८: भारतातली पहिली इंजिनलेस ट्रेन

ट्रेन १८: भारतातली पहिली इंजिनलेस ट्रेन

Subscribe

भारतातल्या पहिल्या इंजिनलेस ट्रेनची धाव चाचणी मोरादाबाद - रामपूर येथे झाली.

भारताची पहिली इंजिनलेस ट्रेन “ट्रेन १८” याची रविवारी सकाळी मोरादाबाद – रामपूर येथील उत्तर भारतीय रेल्वे ट्रॅकवर चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान ट्रेनची गती आणि ब्रेकची तपासण्यात आली. ट्रेन १८ ची चाचणी सर्वप्रथम मोरादाबाद – बरैली या ट्रॅक वर होणार होती. पण ऐनवेळी काही अडचणींमुळे चाचणीचे ठिकाण बदलण्यात आले. चाचणी दरम्यान या ट्रेनला तीन वेगवेगळ्या वेगाने पळवण्यात आले. ताशी ३० किलोमीटर मग ५० आणि शेवटी ६० किलोमीटर प्रतितास या गतीवर चालवण्यात आले. ट्रेन १८ ची जास्तीत जास्त गती २२० कि. मी. प्रतितास असणार आहे.

तांत्रिक तपासणीसाठी या ट्रेनला विविध वेगावर चालवण्यात आले होते. आधी ३०, ५० किमी प्रतितास चालवल्यानंतर ६० किमी प्रतितास वेगाने चालवताना ट्रेनच्या ब्रेक्स आणि इतर तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष दिले गेले असे या ट्रेनचे काम पाहणारे अधिकारी  डीपी सिंग यांनी सांगितले.ही चाचणी होत असताना विविध टीम स्थापन करण्यात आल्या होत्या. सर्किट, स्वच्छता आणि इतर पैलूंकडे या टीमने लक्ष दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधन डिझाइन आणि मानक ऑपरेशन्स (आरडीएसओ) यांनी या ट्रेनमध्ये एक कंट्रोल डेस्क निर्माण केले आहे.

- Advertisement -

ड्रायविंग कोचमध्ये ४४ तर मागे असणाऱ्या कोचमध्ये ७८ सिट्सची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय ड्रायव्हिंग कॅबच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, जेणेकरुण चालकाला प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -