घरदेश-विदेशबलात्कार प्रकरणी तृतीयपंथीयही करणार गुन्हा दाखल

बलात्कार प्रकरणी तृतीयपंथीयही करणार गुन्हा दाखल

Subscribe

तृतीयपंथीयही भादंविच्या कलम ३५४ ए नुसार बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करु शकातात.

दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे आपण पाहतो मात्र तृतीयपंथीवर देखील बलात्कार केल्याच्या घटना वाढत असल्याचे आपण ऐकतो. परंतु एखाद्या महिलेवर बलात्कार झाला की ती महिला त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करतात. मात्र एखाद्या तृतीयपंथीवर बलात्कार झाल्यास त्यांना गुन्हा दाखल करण्याचा कायदा नव्हता. मात्र आता जर तृतीयपंथीवर बलात्कार झाल्यास ते आता गुन्हा दाखल करु शकतात. असं दिल्ली पोलिसांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे. त्यासाठी पोलिसांनी कोर्टाला क्रिमिनल लॉचा हवालाही दिला आहे.

तृतीयपंथीयचा आरोप

पोलीस लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करुन घेत नसल्याचा आरोप एका तृतीयपंथीयाने केला होता. तशी याचिकाही त्याने कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे कोर्टाने पोलिसांना नोटीस बजावली होती. या नोचीसमध्ये तृतीयपंथीय लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करु शकत नाहीत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर पोलिसांनी सांगितले की, जर तृतीयपंथीयांनी भादंविच्या कलम ३५४ ए नुसार बलात्कारचा गुन्हा दाखल केला तर आरोपींच्या विरोधात कारवाई करता येते असे स्पष्टीकरण दिलं होते.

- Advertisement -

या याचिकेत भादंविच्या ३५४ एच्या पोटकलम (१) च्या (i), (ii) आणि (iv)च्या संविधानिक वैधतेला आव्हान देण्यात आले होते. पोलीस या कलमांचा हवाला देऊन माझ्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबतचा गुन्हा दाखल करुन घेत नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -