घरदेश-विदेशआणि तो खजिना मिळाला....

आणि तो खजिना मिळाला….

Subscribe

पूर्वीपासून आपण ऐकतोय की, इतिहासात राजे लोकांना खोदकाम केल्यावर गुप्त धन सापडायचं, अशा अनेक घटनांची इतिहासात नोंदही आहे. आजच्या काळात पण अशी घटना घडली आहे. जिथे एका जोडप्याला गुप्त धन सापडले. न्यूयॉर्कमधील स्टेटन आईसलँडमध्ये एका जोडप्याला हे धन सापडलं. मेथ्यू आणि मारिया अशी दोघांनी नावे असून, बागकाम करताना त्यांना हा धनलाभ झाला.
बागकामाची आवड असल्यामुळे घराच्या आवारात वृक्ष लावण्यासाठी ते खड्डा खोदत होते. साधरण दीड फूट खोदल्यानंतर अचानक त्यांना वेगळाच आवाज आला. हा आवाज कसला आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अजून खोदकाम सुरुच ठेवले. काही फूट आणखी खणल्यानंतर त्यांना आत पत्र्याची पेटी सापडली. आणि त्या पेटीतले सामान पाहून त्यांना धक्काच बसलाल्. या पेटीत सोने, चांदी आणि हिऱ्यांचे आभूषणे होती, ज्याची किंमत साधरण ५२000 डॉलर म्हणजेच ३ कोटींपेक्षा जास्त रुपये इतकी आहे.
एवढी महागडी आभूषण बघून मेथ्यू समजून गेला की, हा चोरीचा माल असल्याचा संशय आला. त्या पेटीखाली एक पत्तासुद्धा होता. त्या पत्त्यावरील घर काही अंतरावर होते. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. शिवाय त्या पत्त्यावरील माणसाला देखील कळवलं. त्यावेळी २०११ साली त्यांच्या घरी चोरी झाल्याचे समजले आणि या संदर्भातील तक्रार त्यांनी पोलिसात केल्याचे देखील कळाले. त्यामुळे मूळ मालकाला तब्बल ७ वर्षानंतर ही पेटी मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -