घरदेश-विदेशVideo: जेव्हा घोडा अचानक 'बार'मध्ये घुसतो

Video: जेव्हा घोडा अचानक ‘बार’मध्ये घुसतो

Subscribe

घोडा खूप वेगाने बारमध्ये घुसल्यामुळे तिथे उपस्थित लोक घाबरले आणि त्यांनी धावपळ सुरु केली

अनेकजण पार्टीसाठी किंवा आपला वीकएंड सेलिब्रेट करण्यासाठी बारमध्ये जाणं पसंत करतात. बारमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणं अनेकांना आवडतं. विशेषत: परदेशात विकेंडला, सुट्टीच्या दिवशी बार किंवा पबमध्ये जाऊन निवांत वेळ घालवण्याचं कल्चर अधिकप्रमाणात आहेत. मात्र, माणसं जातात त्या बारमध्ये अचानक कुठूनतरी एक घोडा आला आणि त्या घोड्याने बारमध्ये धुमाकूळ घातला तर? अशीच एक घटना घडली आहे फ्रान्सच्या एका बारमध्ये. पॅरीसच्या एका बारमध्ये अचानक शर्यतीतला एक घोडा शिरला आणि आत शिरताच त्याने बारमधील फर्निचरची पाडपाडी सुरु केली. बारच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा सर्व मजेशीर प्रकार रेकॉर्ड झाला. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. मात्र, घोड्याच्या अशा अचानक येण्याने बारमधील ग्राहक आणि कर्मचारी यांची तारांबळ उडाली. घोडा बारमध्ये गोंधळ घालत असताना तिथले लोक सुखरुप बारबाहेर पडण्यासाठी धावपळ करत होते.

अचानक कुठून आला घोडा?

रेसकोर्सवरुन राईड करुन आलेला तो घोडा मालकासोबत रस्त्याने चालला होता. मात्र, मध्येच अचानक तो धावू लागला आणि धावता धावता एका बारमध्ये शिरला. घोडा खूप वेगाने बारमध्ये घुसल्यामुळे तिथे उपस्थित लोक घाबरले आणि त्यांनी धावपळ सुरु केली. घोड्याच्या समोर येऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. तर दुसरीकडे घोडा बारमधील वस्तूं आपल्या पायांनी उडवत आणि पाडत होता. सुदैवाने या घटनेदरम्यान घोडा किंवा लोक यापैकी कुणीच जखमी झाले नाहीत. या बारचा मालक स्टीफन जस्मिन यानेच हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


वाचा: प्रवासी बनले चोर; रेल्वेमधून २ लाख टॉवेल चोरीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -