घरदेश-विदेशहाथरस घटनेविरोधात देशात ‘श्रद्धांजली यात्रा’

हाथरस घटनेविरोधात देशात ‘श्रद्धांजली यात्रा’

Subscribe

‘जाती तोडो, भारत जोडो, ‘समाज जोडो, भारत जोडो’! अशा घोषणा देत तीन दिवसांपासून देशभरात हाथरस घटनेप्रकरणी ‘श्रद्धांजली यात्रा’ काढण्यात येत आहे.

‘जाती तोडो, भारत जोडो, ‘समाज जोडो, भारत जोडो’! अशा घोषणा देत तीन दिवसांपासून देशभरात हाथरस घटनेप्रकरणी ‘श्रद्धांजली यात्रा’ काढण्यात येत आहे. राजस्थान, हरियाणामध्ये यात्रा काढण्यात आल्यानंतर ९ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे पीडितेच्या घरात रोपटे लावून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. हाथरस घटनेने भारतीय घटनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. त्यामुळे भारतीय घटनेचा आदर करून दलितांना खरा न्याय, आदर, सन्मान द्यावा यासाठी देशभरात ‘श्रद्धांजली यात्रा’ उपक्रम राबवण्यात येत आहे.

वाल्मीकि भीम संघर्ष सेनातर्फे ७ ते ९ ऑक्टोबरपर्यंत ‘श्रद्धांजली यात्रा’ उपक्रम राबवण्यात आला. राजस्थानमधील अलवर, इस्माईलपूर, हरियाणामधील झिरका-फिरोजपूर, बीमा, भरतपूर, पहाडी येथे ‘श्रद्धांजली यात्रा’ काढण्यात आली. त्यानंतर ९ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील मथुरा, अलिगड आणि हाथरस येथे दुपारी २ वाजता मूठभर माती घालण्यात आली. पीडितेच्या अंगणात एक रोपटे लावून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. आम्ही जळत्या आणि ज्वलंत जीवनातील थंड सावलीचे प्रतीक म्हणून या देशाच्या झाडाच्या झाडावर उपचार करून देशातील नागरिक योगदान देऊ. असे यावेळी यात्रेचे नेतृत्व करणारे अमोल मडामे, फिरोज मिथिबोरवाला, राम तरुण आणि राज बाला यांनी सांगितले.

- Advertisement -

हाथरस सामूहिक बलात्काराच्या न्यायासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करावी. मृताच्या स्मरणार्थ शहीद स्मारक बांधले जावे. सरकारने नैतिक जबाबदारीसह राजीनामा द्यावा, कुटूंबाला संरक्षण द्यावे आणि पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी, डीएनए चाचणी करावी, अशा मागण्या यावेळी वाल्मीकि भीम संघर्ष सेनेकडून करण्यात आल्या. उपक्रमादरम्यान ‘जाती तोडो, भारत जोडो, ‘समाज जोडो, भारत जोडो’! अशा घोषणाही देण्यात आल्या, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता वर्षा विद्या विलास यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -